जिल्ह्यांतील ९१ ग्रामपंचायतींवर शासन जुन्या कायद्याच्या आधारेच प्रशासकाची नियुक्ती करणार


रायगड जिल्ह्यांतील ९१ ग्रामपंचायतींवर शासन जुन्या कायद्याच्या आधारेच प्रशासकाची नियुक्ती करणार राज्य शासनाचा अध्यादेश जारी
संजय खांबेटे : म्हसळा 
कोरोनामुळे राज्यातील १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत समाप्त होत आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेता येणार नसल्याने त्या पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला. ग्रामपातळीवर कोरोनाच्या नियंत्रणची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवकावर आहे. ग्राम पंचयतीच्या निवडणुका किमान सहा ते आठ महिने कोव्हीड १९ मुळे होणार नसल्या बाबतचे शासनाचे धोरण आहे.ग्रामपंचायतच्या कारभारावर परिणाम होता कामा नये म्हणून सरकारने ग्रामपंचायतवर योग्य व्यक्तीची निवड करण्याबाबत काढण्यात आलेला अध्यादेश राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे .त्यामुळे जुन्या कायद्याच्या आधारेच ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याचे सांगण्यात येते. रायगड जिल्ह्यातील जून २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां च्या मार्फत प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू आसल्याचे जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यानी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील जून २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे त्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे
तालुका रोहा
१) निडीतर्फे अष्टमी , जुलै २०: तालुका कर्जत १) कोल्हारे २) जिते तालुका रोहा ३) रोठ (बु) ४)रोठ(खु) ऑगस्ट २० तालुका अलिबाग १) मानतर्फे झिराड २) सासवणे३) पेझारी ४) वाघोडे पनवेल ५) बारवई६) साई ७) सावळे ८) क्डघर ९)नानोशी १०) पोसरी ११) खानावले१२) उलवा १३)कोळखे१४) सांगुर्ती१५) मोरबे १६) वाकडी १७) वाजे कर्जत १८) पोशीर १९) साळोख तर्फे वरेडी २०)हुमगाव माणगाव २१) बामणोली २२) देवळी २३) लोणारे २४) लाखपाले२५) टेमपाले सप्टेंबर २० तालुका पेण १)काळेश्री २) बोरझे ऑक्टो पेण १)वाकरुळ. पनवेल २) खानाव ३)वलप ४ ) आकुर्ली ५) हरिग्राम ६)खैरवाडी ६) उमरोली ७) आपटा ८) उलवा९) पालीदेवद, १०)तरघर ११) उसरली(खु) १२) देव ळोली १३) कवाळे १४) पाले(बु) १५)वारदोली नोव्हेंबर २० पेण तालुका १ ) खारपाले२) कामालीं३) आंबेघर ४) जोहे उरण तालुका ५)चाणजे ६) केगाव ७) नागाव ८) म्हातवली९) फुंडे१०) वेश्वी कर्जत तालुका ११) कडाव१२) वैजनाथ १३)भिवपुरी १४) दामत रोहा तालुका १५)तळाघर१६) घोसाळे १७) शेणवई१८) घामणसई १९) मालसई२०) महाळुंगेर१) शेंडसई २२)तिसे २३)वरसे २४)वरवठणे २५)खांब २६)पळस २७ ) कोंडगाव २८) ऐनघर२९) चिंचवली त. दिवाळी३०) वाशी३१)वावे पोटगे ३२) गोवे महाड तालुका ३३) नरवण ३४) भेलोशी३५) मांडले३६)आसनपोई३७) बिरवाडी

तालुका श्रीवर्धन १)कोलमांडले २)कारिवणे ३)गालुसरे ४)दिघी 
म्हसळा तालुका १ )पाभरे२) केल्टे ३) लिपणी वावे

"पालकमंत्र्यांशी सल्लामसलत करूनच सीईओंनी प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबतची अधिसूचना अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी काढली होती. परंतु न्यायालयाने याला अवैध ठरविले. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०२० निरसित (रद्द) करण्याचा निर्णय घेतला."

"जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे त्यांचे प्रशासक पदी न्यायालयाच्या आदेशांनुसार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या सर्व ग्राम पंचायतींवर विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीप्रशासक
म्हणून नियुक्ती केली आहे."
श्रीमती शितल पुंड,उपमुख्यकार्यकारी अधिकारी रा.जि.प. आलिबाग

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा