आमदार अनिकेत तटकरे अभिष्टचिंतन विशेष...!



कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार , कोकणच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवुन रचनात्मक कार्यावर भर देणारे युवकांचे लाडके नेतृत्व अनिकेतभाई तटकरे यांचा आज वाढदिवस त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा ! 
 भाई या नावातच जसा एक वेगळा जिव्हाळा आहे तसेच एक मोठी जबाबदारीही या नावाबरोबरच ओघाने येते .
प्रेम, जिव्हाळा , आपुलकी या सगळ्याला जबाबदारीचे कोंदण देऊन एक सर्वसामान्य कार्यकर्ते ते आमदार हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे .
 अत्यंत लहान वयात कोकणवासीयांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची भाईंना संधी मिळाली या मिळालेल्या संधीचे सोने करत विविध संसदीय आयुधे वापरून आपल्यातील उत्तम संसदपटूचे दर्शन घडवले .कधी लक्षवेधीच्या माध्यमातुन तर कधी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातुन कोकणच्या अनेक समस्या वरिष्ठ सभागृहात मांडल्या व त्या समस्यांचा योग्य तो पाठपुरावादेखील केला .
 एक सजग लोकप्रतिनिधि म्हणुन सुपरिचित असलेले भाई हे मनाने अत्यंत संवेदनशील आहेत , राजकारणापलिकडे जाऊन मित्र मंडळी , कुटुंब , जुन्या परंपरा जपणारे व व्ही .आय .पी .कल्चरमध्ये न रमता आपले पाय जमिनीवर ठेवुन लोकांच्या गोतावळ्यात कायम रममाण होणारे हे व्यक्तीमत्व खऱ्या अर्थाने लोकांना जवळचे व आपले वाटते .
काही व्यक्ति आपल्या आयुष्यात आल्या की त्यांच्या येण्याने आपल्या आयुष्यातील लिटमस अचानक रंग बदलू लागतो , त्यांच्या प्रत्येक भेटीत ते नव्याने आपल्याला समजायला लागतात , उमजायला लागतात आणि आपल्या मनातील त्यांच्याबद्द्लची प्रेमाची , आपुलकीची भावना आधिकाधिक वाढीस लागते आपल्या भाईंच्या बाबतीतही अगदी तसेच आहे याचा अनुभव त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतला आहे .
साहेबांचे व आईंचे आशिर्वाद , त्यांच्या सहचारीणी सौ .स्नेहावहीनींचा त्यांच्या प्रत्येक कार्यात मिळणारा पाठींबा , भगिनी आदितीताईंची प्रत्येक वाटचालीत मिळणारी साथ (हे नातंच खरोखर कमाल आहे ), व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांच्या प्रेमाची ऊर्जा या सर्व गोष्टी पाठीशी असल्यामुळे अनेक वादळांशी झुंज देत हे व्यक्तीमत्व आधिकाधिक प्रगल्भ होत आहे .
 भविष्यात यशाची याहुनही मोठी शिखरे आपण सर करावीत व आपली सर्व स्वप्न पुर्ण व्हावीत ह्या आमच्या मनस्वी शुभेच्छा व सद्भावना ! 
         निखिल माधव दाते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा