तळा तालुक्यातील खांबवली ग्रामस्थांनी राबविले ग्रामस्वच्छता अभियान..



तळा(किशोरपितळे)
तालुक्यातील खांबवली येथे शुक्रवार २ आँक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधूनस्वच्छता अभियानराबविण्यातआले.शासनाच्या सुचनाप्रमाणे मास्क, हँड ग्लाँज शारिरीक अंतर राखून  कोरोना सारख्या महामारी संकटावरमातकरण्यासाठी  व गावातील लोकांना कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत म्हणून संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने हाकार्यक्रम घेण्यात आला होता.या मध्ये गावातील मुख्य रस्ता, पायवाटा,पिण्याच्या पाण्याची टाकी,गुरांच्या पाणी पिण्याची टाकी,प्लास्टिक पिशवी,प्लास्टिक पाणी बाटली,केरकचरा,लहानसहान झाडी पावसाळी उगवलेली झाडे,गवत साफसफाई केली.त्याचप्रमाणे ग्रामदेवता मंदिर हनुमान मंदिर परिसर रस्ता,शालेय क्रिडांगण,अंगणवाडी परिसर,महिला कार्यशाळा, होळीचा चौथरा परिसर इत्यादी ठिकाणे साफसफाई करण्यात आली.. तसेच निसर्ग चक्रीवादळात अस्ताव्यस्त झालेल्या पाऊलवाटा आणि परिसराची डागडुजी करण्यात आली संपूर्ण दिवसभर पुरुष मंडळी सोबतच महिलानीं सुद्धा मोठा सहभाग घेत श्रमदान केले.या समयी शेणवली ग्रुप ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच गंगारामभोरावकरकुणबीसमाजोन्नती संघ मुंबई शाखा तळाचे उपाध्यक्ष ग्रामस्थ यशवंत शिंदे.मंडळाचे सचिव रांजेद्र भोरावकर ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम कजबळे, महिला मंडळाच्या सचिव पुनम कजबळे, महिला बचत गट सदस्याश्रीमतीकृष्णी पिंपळे,रसिकाकजबळे, तसेच ग्रामस्थमंडळाचे जेष्ठसल्लागार विठ्ठलकजबळे, मुंबई मंडळाचे सचिव  चंद्रकांत भोरावकर,सदस्य मनोहर कजबळे सुरज कजबळे ऊपस्थित होते याकरिता ग्रामस्थमंडळाचे पदाधिकारी पांडुरंग शिंदे, गणपत कजबळे, काशिराम शिंदे,रामभाऊ भोरावकर, महादेव कजबळे, लक्षमण शिंदे,सुरेश कजबळे, उमेश कजबळे, युवा  प्रतिनिधी देविदास कजबळे, तसेच महिला प्रतिनिधी  आणि सदस्य याचें खूप मोठे सहकार्य लाभले.या वेळी उपस्थितांच्या वतीने कोरोनाच्या महामारीचा  संकट दुर  करण्यासाठी  आपले गाव आपली जबाबदारी याची संकल्पना मांडण्यात आली.मागील सहा महीने काळजी घेऊन माझा गांव स्वच्छ गांव हि संकल्पना राबवली "गाव करी ते राव काय करील"असा संदेश समाजात गेला आहे. या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे..

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा