महाराष्ट्रामध्ये सतत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ तळा तहसीलदार यांना निवेदन.



तळा (किशोरपितळे)

तळा तालुका भाजपा महिला मोर्चा वतीने महाराष्ट्रात सतत होणाऱ्या महीला च्या अत्याचारा निषेधार्थ मोर्चा १२आँक्टोंबर रोजी मा. उमाताई खापरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा,भाजपा महिला मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली तळा तालुका भाजपा मोर्चा अध्यक्षा तथा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा हेमा मानकर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला होता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार दिवसेंदिवस वाढत असून कोविंड आजाराच्या उपचारासाठी गेलेल्या महिला, बालीका, अल्पवयीन महिला, बलात्कार व खुन अशा घटना वारंवार घडत असताना शासन मात्र कडक कायद्या निर्मिती न करता या शिवरायांच्या राज्यात आश्वासन देत आहेत व आरोपी मोकाट सुटत आहेत त्यामुळे अत्याचार बोकाळला आहे.आजची अजूनही सुरक्षित नाही.या सरकारचे लक्षवेधण्यासाठी आक्रोशआंदोलन पुकारले आहे.अशा गुन्हांंच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारने कडक कायदा करावा.अशी प्रमुख मागणी महीला मोर्चा संघटनेने केली आहे.हा मोर्चा कोरोनाचे शासनाने दिलेल्या नियमानुसार शारीरिक अंतर राखून काळजी घेऊन मा.तहसीलदार ऐ एम. कनशेट्टी यांना निवेदन सादर केले या मोर्चामध्येमहिला भगिनी व सर्व कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा