साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड तर्फे 14 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन कवी संमेलन



रोहा (निखिल दाते)
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वातंत्र्य, समता, बंधूता,न्याय या मुल्यांचा संदेश समाजात पोचण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता साहित्यानंद प्रतिष्ठान रायगड तर्फे ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती रायगड जिल्ह्यातील प्रतिथयश साहित्यिक तसेच साहित्यानंद प्रतिष्ठान रायगडच्या अध्यक्षा सौ.संध्या दिवकर यांनी दिली.
साहित्यानंदचे संस्थापक श्री. विजय वडवेराव यांच्या सुक्ष्म नियोजनातून महाराष्ट्रातील 13 जिल्हे व बेळगाव येथेही हा उपक्रम संपन्न होणार असल्याचे  सौ. संध्या दिवकर यांनी सांगितले.
साहित्यानंद रायगड आयोजित काव्य संमेलनाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गडकिल्ले अभ्यासक तसेच लेखक रायगड भूषण श्री. सुखद राणे हे भूषवणार असून प्रमुख निमंत्रित पाहुणे म्हणून रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील सर उपस्थित राहणार आहेत.
सदर ऑनलाईन काव्य संमेलनात मंगेश कंक-महाड,उमेश जाधव-पाली, सिद्धेश लखमदे-मुरुड, गणेश भगत-रोहा, सुभाष दौंड-खोपोली, मछिंद्र म्हात्रे-उरण, हिरामण पाटील-पेण, सायराबानु चौगुले-माणगाव, हणमंत शिंदे-रोहा, सौ. संध्या दिवकर-रोहा आदी रायगड मधील नावाजलेले साहित्यिक सहभागी होणार आहेत.
साहित्यानंद रायगडचे हे ऑनलाईन कविसंमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थापक श्री. विजय वडवेराव यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यानंद रायगडच्या कार्यक्षम अध्यक्षा सौ. संध्या दिवकर,कार्याध्यक्ष मंगेश कंक हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा