रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता


रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता : बॅंक व्यवस्थापनेचे होत आहे कौतुक

संजय खांबेटे म्हसळा 
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही रायगड जिल्हयात व राज्यात सहकारी क्षेत्रात अनेक वर्ष नावारूपास असतानाच आता राज्याचे मंत्रीमंडळ बैठकीत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला शासकीय बँकींग व्यवहार करण्यास मान्यता मिळाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या मान्यता देतानाशासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन, आर्थिक दृष्टया सक्षम व नियामानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या बँकांसंदर्भात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाकडून अभिप्राय घेण्यात येतात. तसेच सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने मागील ५ वर्षातील लेखापरिक्षण अहवाल "अ" वर्ग असणाऱ्या बंकांची शिफारस होत असते.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह शासकीय बँकींग व्यवहार करण्यास मान्यताप्राप्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा समावेश आहे.तसेच आयडीबीआय आणि विदर्भ – कोकण ग्रामीण बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार करायला राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्हयांतीत महत्वाच्या शहरांसह ६० शाखा असून बँकेची गुंतवणूक सुमारे १४०० कोटीची आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा