फोटो-म्हसळा तालुक्यातील म्हसळा बेलदार वाडी ,केल्टे,मेंदडी,खरसई व चिखलप या गावांमध्ये निसर्ग चक्री वादळामध्ये नुकसानीची पाहणी करताना भाजपचे आ. अमित साटम दिसत आहेत. छाया-निकेश कोकचा
संकट काळात गरीबांना मिळणार्या धान्यावर सत्ताधारी पक्षाचा डल्ला:भाजपा आ.अमित साटम यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल
वादळग्रस्त नागरिकांची थट्टा:पंचनाम्यामध्ये नुकसनाची टक्केवारी न लिहिल्याने पुन्हा पंचनामा करण्याचे आदेश
म्हसळा(निकेश कोकचा)
3 जून रोजी आलेला निसर्ग चक्रीवादळ थांबला असला तरी,राजकीय पक्षांमध्ये एकमेकांविरोधात टीका करण्याचा वादळ थांबण्याचा नाव घेत नाही आहे. भाजपचे आ.अमित साटम यांनी संकट काळातही सत्ताधारी गरीबांना मिळणार्या धान्यावर डल्ला मारत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीवर टीका केली.
गुरवारी भाजपचे आ.अमित साटम हे म्हसळा तालुक्यातील म्हसळा बेलदार वाडी ,केल्टे,मेंदडी,खरसई व चिखलप या गावांमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी ही टीका केली.नुकसानीची पाहणी करताना त्यांचा सोबत भाजप राज्य परिषद सदस्य संजय कोणकर, श्रीवर्धन मतदार संघ अध्यक्ष कृष्णा कोबनक,म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर,अल्पसंख्याक अध्यक्ष समीर धनसे,तालुका सरचिटणीस महेश पाटील,मेंदडी गण अध्यक्ष अनिल टिंगरे,पाभरे गण अध्यक्ष सुनील टिंगरे,शहर अध्यक्ष मंगेश मुंढे यांच्या सहित भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.साटम यांनी सत्ताधारी पक्षातील नेते गरिबांसाठी आलेले धान्य दादागिरी करून एक तर स्वतचा घरी ठेवतात नाहीतर हेच धान्य वाटण्यात पक्षपात करून गरिबांच्या धान्यावर सत्ताधारी डल्ला मारत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
निसर्ग चक्री वादळामुळे ज्यांचे घर पडलेले आहेत अथवा ज्या घरांना नुकसान झालेला आहे, त्या झालेल्या नुकसानीचे शासनाकडून १००% पंचनामे करण्यात आले होते.मात्र रातोरात महाविकास आघाडीने पंचांनाम्याचे निकष बदलण्याचा जी.आर काढला आहे.पुन्हा पंचनामे करण्याचा नावाने मदतीच्या प्रतीक्षेत असणार्या नुकसानग्रास्थांची थट्टा या शासनाने मांडली असल्याचे आरोप आ.साटम यांनी केले.पुन्हा पंचनामे होणार का? या प्रश्नाला अधिकार्यानी देखील दुजोरा दिला आहे.
Post a Comment