प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील खरसई येथील ग्रामसेवक सातत्याने अनुउपस्थित राहत असल्याने निसर्ग चक्रीवादळाने ओढवलेल्या परिस्थिती चे पंचनामे करण्याचे महत्त्वाचे काम खरसई गावात अजूनही पूर्ण झालेले नाही.
ग्रामसेवक यांना पंच नामे करण्यासाठी म्हसळा तहसिलदार यांनी नेमणूक करूनसुद्धा वरिष्ठांना कोणतीही सूचना न देता सातत्याने अनुउपस्थित राहत असल्याने नुकसानीचे पंचनामे होण्यास दिरंगाई होत आहे
पंचनामे होणार कधी आणि शासनाचा मदतनिधी आपल्यापर्यंत पोहोचणार कधी असा प्रश्न ग्रामस्थ करत आहेत.
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यामध्ये 100 कोटींची मदत जाहीर केली. मात्र चक्रीवादळ होऊन 9 दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहचली नसल्याने आणि पंचनामे ही वेळेवर होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
मायबाप सरकार ने याकडे तात्काळ लक्ष देण्याची विनंती खरसई कर करीत आहेत.
Post a Comment