बोर्लीपंचतन येथील वादळग्रस्त गरीब गरजु कुटुंबाना एक हात मदतीचा ; डॉ.राजेश पाचारकर यांचा सेवाभावी उपक्रम


 मकरंद जाधव-बोर्लीपंचतन 

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. वादळामुळे घरांचे छप्पर उडुन घरे उध्वस्त झाली आहेत त्यातच कोसळणाऱ्या पावसामुळे घरातील सर्व सामान भिजुन काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.आधीच कोरोनाच्या दहशतीने गेले तीन महीने ठप्प झालेला रोजगार या संकटातुन सावरण्याची धडपड करीत असलेल्या रायगवासीयांवर निसर्ग वादळाने आपला प्रकोप दाखवुन श्रीवर्धन किनारपट्टीवरील गावे उध्वस्त केली आहेत.विजपुरवठा खंडीत असल्याने गावे काळोखात बुडाली आहेत नागरीक पूर्णपणे भेदरलेल्या मनस्थितीत आहेत.आज या उध्वस्त कुटुंबाना या परीस्थितीत मदतीची नितांत आवश्यकता आहे अशा वेळी आपल्या गावासाठी वेळोवेळी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतुन गावामध्ये विवीध आरोग्य शिबीरांच्या माध्यमातुन गोर गरीबांची सेवा करण्याची धडपड करणारे बोर्लीपंचतन येथील सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ.राजेश धर्मा पाचारकर यांनी बोर्लीपंचतन येथील काही गरीब व गरजु अशा १२० कुटुंबांना जिवनावश्यक वस्तु,सौर उर्जेवरील दिवे मेणबत्या मास्क,मच्छर अगरबत्ती यांचे वाटप करुन काही गरजु कुटुंबांना आपल्या परीने मदत करुन त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचबरोबर बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सौरदिवे व मेणबत्त्यांची भेट दिली.या कामी त्यांच्या मित्रमंडळाच्या सहकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करुन सर्व मदत गरजु कुटुंबांच्या घरपोच पोहचवुन त्यांना मोलाचे सहकार्य केले.कोरोना महामारीने देश संकटात आहे.अशातच रायगड जिल्ह्यावर आलेल्या निसर्ग वादळाच्या भयंकर संकटाने रायगडवासी पुरते उध्वस्त झाले आहेत.अशा संकटाच्या वेळी अडचणीत असलेल्यांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.ते कर्तव्य निभावण्याच्या उद्देशाने व सामाजिक जाणिवेच्या भावनेतुन या संकटसमयी आमच्या परीने थोडाफार खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.अशा आपल्या भावना डॉ.राजेश पाचारकर व त्यांच्या पत्नी सौ.आरती कुळकर्णी पाचारकर यांनी आमच्या प्रतिनीधीजवळ व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा