खा.तटकरे यांनी निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर घेतली आढावा बैठक



तळा(किशोर पितळे) रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्री वादळाने पुर्ण निस्तनाभूत करून टाकले.एकाक्षणात होत्याचे नव्हतेकरून टाकले.सर्व सामान्याचे जनजीवन विस्कळीतझाले.या वादळात अनेकांची घरे,बागायतीचे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली प्रचंड आर्थिक नुकसान झाले. व वीज पोल पडले वीज खंडित झाली आजहीअनेक गावात वीज नाही अशा भयानक परिस्थितीचीपहाणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतलीयावेळी व्यासपीठावर खा.सुनिल तटकरे, नगराध्यक्षारेश्मा मुंढे,उपनगराध्यक्षा सायली खातू जि प सदस्या गिताताई जाधव,जि पसदस्य बबन चाचले,पं.स. सभापती देवकी लासे तहसीलदार कनशेट्टी,बिडिओ. विजय यादव उपस्थित होते. यावेळी महा वितरणच्यानियोजन शुन्य कारभारावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. यावेळी चक्रीवादळात नुकसान झालेल्या १० हजार लोकांना भरपाईचे ११कोटीचे चेक वैयक्तिक बँक खात्यात जमा झाले असून उर्वरित वादळग्रस्ताचे लवकरच जमा होणार असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले.केरोसीनचे
पाच लिटर मोफत वाटप,मोफत प्रती माणशी पाच किलो.तांदूळ वाटप, मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांना देखील धान्य का दिले जात नाही यांच्या तक्रारीआल्या असून तो देखील वंचित राहिला नाही पाहिजे असे आदेश महसूल प्रशासनाला दिले.यावेळी पत्रकार संजय रिकामे यांनी प्रा.आ.केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कन्सल्टींग रूमचे पत्रे उडाले असून सद्यस्थितीत व्हरांड्यात तपासणी केली जात आहे.निवासी कक्ष,कर्मचारी निवासीरूमचे पत्रे उडाले आहेत.अनेक कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी वीजमंडळाच्या कारभारावरसंतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.सर्व समस्या जाणू घेऊनखा.तटकरे यांनी महावीज वितरणच्या कासवगतीच्याकामावरनाराजीव्यक्तकेलीतालुक्यातील६५गावाची नावे न विसरता घेऊन आढावा घेतला. तालुक्यातील नागरिक आपल्या मदतीला धावून आले असून आपण आपली टीम सक्रीय केली पाहिजे. वावे धरणाच्या परिसरात अवलंबूनअसणाऱ्या गावात अजूनही वीजपुरवठा का चालू झाला नाही याचा आढावा घेऊन त्या पाण्यावर पाच ते सहा गावे अवलंबून आहेत प्रथम प्राधान्य द्या तळा तालुक्यातील निम्म्या गावात वीजपुरवठा झाला असल्याचे सांगून इतर भागात लवकरात लवकर वीजपुरवठा चालू करण्याचे आदेश दिले आहेत. तळा तालुक्यातील जनतेचा संयम व त्यानी या काळात केलेली मदत हि प्रशंसनीय आहे अशा शब्दात आभार व्यक्त केले.या आढावा बैठकीलावीज वितरण अधिकारी, इंजीनियर, प्रमुख कार्यकर्ते, सरपंच,पंचायत समिती कर्मचारी वर्ग पत्रकार बंधू भगीनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा