चक्रीवादळा नंतर म्हसळ्यात चक्की वादळ ; पिठाच्या गिरणीवर तोबा गर्दी

चक्रीवादळा नंतर म्हसळ्यात चक्की वादळ: पिठाच्या गिरणीवर तोबा गर्दी:दळण्यासाठी आठ दिवसाची वेटिंग लिस्ट 

म्हसळा(निकेश कोकचा)

३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे खेडेगावातील जनजीवन पुर्णपणे विसखळीत झाले आहे.खेडेगावातील नागरिकांना चक्रीवादळाच्या २० दिवसा नंतर देखील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.यातील एक समस्या म्हणजे पीठ दळून आणणे ही आहे.पीठ दळण्यासाठी चक्क ८ दिवसांची वेटिंग असल्याचे समजते.
चक्रीवादळामुळे महावितरणाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसत आहे.यामुळे गावातून लाईट गायब झाली आहे.लाईट नसल्याने गावातील पिठाच्या गिरणी देखील बंद पडल्या आहेत.यामुळे लाईट असणार्‍या म्हसळा शहरात ३ पिठाच्या गिरणींमध्ये सकाळी ५ वाजल्या पासून दळण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात खेडेगावातील महिलांची गर्दी जमा होत असून ती गिरण बंद होई पर्यन्त असते.म्हसळ्यातील गिरणींवर तत्काळ दळण दळून हवे असल्यास सकाळ पासून ते रात्री पर्यन्त लाईन मध्ये उभे राहावे लागते.जर का लाईन मध्ये उभे राहायचे नसेल तर ८ दिवसांनी तुम्हाला दळण दळून मिळेल असे सांगण्यात येते.आधीच चक्रीवादळा मुळे घरांचे नुकसान होऊन अद्याप घर ना दुरुस्त आहेत,त्यात घरातील महिलाना जेवण बनवण्याकरिता ५ ते १० किलो पीठ सपूर्ण दिवस लाईन मध्ये उभे राहिल्यानंतर दळून आणावे लागत असल्याने या महिलांकडून सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चौकट-वाहनांची सुविधा उपलब्ध नसल्याने १० ते १५ किलोमीटरची पायपिट करून या महिला म्हसळ्यामध्ये दळण दळण्यासाठी घेऊन येतात.मात्र बुधवारी अचानक नगरपंचायत मधून चक्की बंद करण्याचा फरमान आल्यानंतर चक्की बंद करण्यात आली.मात्र नगराध्यक्षा जयश्री कापरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समीर बनकर,सेनेचे शहर प्रमुख मुन्ना पानसरे यांच्या मध्यस्थीनंतर शहरातील पिठाच्या गिरणी पुन्हा सुरू करण्यात आल्या.
फोटो-दळण दळून घेण्यासाठी पिठाच्या गिरणी समोर महिलांची झालेली मोठी गर्दी दिसत आहे.छाया-निकेश कोकचा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा