चक्रीवादळग्रस्तांना मदत करण्यास सरकार अपयशी-देवेंद्र फडणवीस


श्रीवर्धनमधील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
अभय पाटील : बोर्लीपंचतन
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यामध्ये 100 कोटींची मदत जाहीर केली. मात्र चक्रीवादळ होऊन 9 दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहचली नसल्याने नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार अपयशी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

निसर्ग चक्रीवादळामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, म्हसळा, तळा, रोहा, महाड व अन्य भागांचे प्रचंड नुकसान झाले. आज (11 जून) विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात नुकसानीची पाहणी केली. श्रीवर्धन तालुक्यात फडणवीस यांनी दिघी, दिवेआगर, भरडखोल, मुळगाव कोळीवाडा, जीवना बंदर, त्याचप्रमाणे निगडी गौळवाडी येथील घराची भिंत अंगावर पडून मृत्यू झालेल्याFda अमर पंढरीनाथ जावळेकर (वय 16) या मुलाच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर हॉटेल सी विंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्रीवर्धनमधील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
अभय पाटील/बोर्लीपंचतन : निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्यामध्ये 100 कोटींची मदत जाहीर केली. मात्र चक्रीवादळ होऊन 9 दिवस उलटल्यानंतरही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत पोहचली नसल्याने नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार अपयशी असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

निसर्ग चक्रीवादळामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, म्हसळा, तळा, रोहा, महाड व अन्य भागांचे प्रचंड नुकसान झाले. आज (11 जून) विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवर्धन तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात नुकसानीची पाहणी केली. श्रीवर्धन तालुक्यात फडणवीस यांनी दिघी, दिवेआगर, भरडखोल, मुळगाव कोळीवाडा, जीवना बंदर, त्याचप्रमाणे निगडी गौळवाडी येथील घराची भिंत अंगावर पडून मृत्यू झालेल्या अमर पंढरीनाथ जावळेकर (वय 16) या मुलाच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर हॉटेल सी विंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा