दीक्षा म्हात्रे : म्हसळा लाईव्ह
रायगडासह कोकण महाराष्ट्र नेहमीच प्रसंगाला धैर्याने सामोरे जातो.आजचं निसर्ग चक्रीवादळ निधड्या छातीने रायगडाने पुन्हा पेलावले. सरकार, प्रशासन, पोलीस, एन्.डी.आर.एफ., विद्युत यंत्रणा पूर्ण ताकदीने सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.निसर्ग चक्रीवादळाचे केंद्रबिंदू असलेल्या श्रीवर्धन, हरीहरेश्वर, मुरुड, अलिबागसह रायगडात प्रचंड नुकसान झाली आहे. याची तीव्रता कितपत आहे ते समजणं अजून तरी शक्य नाही. अनेक दुर्गम खेड्यापाड्यामध्ये अतिप्रचंड वित्तहानी झाली त्याची मोजमाप करणेही प्रशासनाला कसोटीचं होईल.आधीच अडीच तीन महिने कोरोनामुळे रोजगारावाचून हतबल झालेल्या नागरिकांना आसमानी चक्रीवादळाच्या सामोरी जावं लागलं.घरच्या घरं कोसळून दयनीय अवस्था झाली.कौले ,कोने आणि पत्रे वादळात कित्येक मीटर फेकले जाऊन घरे उघडी पडली.त्यात पाऊसामुळे असले नसलेल्या अन्न धान्याबरोबर कपड्यालत्याचेही नुकसान झाले.आपला जीव वाचवण्यासाठी लोक गावातील समाजघर , शाळा ,मंदिर,धार्मिक स्थळे यांची मदत घेऊन जीवन कंठीत आहेत.रस्तो रस्ती झाडे उन्मळून पडल्याने दळणवळण,विद्युत प्रवाह तसेच मोबाईल यंत्रणा बंद असल्याने नुकसानी संदर्भात मीडियाला कसलाच थांगपत्ता लागत नाही.त्यामुळे मुंबईतील नागरिक गावातील लोकांना शेकडोवेळा संपर्क होत नसल्याकारणाने गावाकडे व मुंबईकडे राहणाऱ्या लोकांची संभ्रम अवस्था,बैचेनी वाढली आहे. वादळात पिचलेल्या व हतबल,निराश्रित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरकार, प्रशासनाबरोबर मुंबईसह महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थांनी तसेच दानशूर दात्याने दुर्गम भाग खेड्यापाड्यातील नागरिकांना मदतीचा हात पुढे केल्यास पुन्हा उभारी घेण्यास बळ मिळेल.मुंबईतून गावाकडे जाणाऱ्या लोकांनी प्रवासादरम्यान पूर्ण सावधतेने जाता कोरोनाच्या सद्यस्थितीचे भान राखावे व प्रशासनाला व आरोग्य विभागाला सहकार्य करावे.प्रत्येकाने आत्मनिर्भर होऊन एकमेकांना साह्य करण्याची वेळ आली आहे.
Post a Comment