अखेर म्हसळ्यातील प्रा. शिक्षकाचे झाले निलंबन : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे तालुक्यात होत आहे स्वागत
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळ्यातील एका दांडी बहाद्दर शिक्षक कोविड -१९ (कोरोना)च्या जाळ्यात आडकला व त्याचे अखेर निलंबन झाल्याचे वृत्त आहे. रा. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या भापट शाळेचा शिक्षक अजय सोपानराव केंद्रे या शिक्षकाला निलंबन केल्याने भापट ग्रमस्थां सह तालुक्यात या निर्णयाचे स्वागत होत आहे.
या बाबत वृत्त असे की,कोविड -१९ (कोरोना) यावर स्थानिक गाव पातळीवर नियोजन असावे म्हणून जिल्हाधिकारी रायगड यानी गाव पातळीवर नियंत्रण कक्ष उघडले होते यामध्ये शिक्षक अजय सोपानराव केंद्रे या शिक्षकाची अत्यंत जबाबदारीच्या कामगिरीवर नेमणूक झाली होती, नेमणूकीच्या कालावधीत सदर शिक्षकाने जिल्हाधिकारी रायगड यानी दिलेल्या संचार बंदीचे आदेशाचे उल्लंघन करून धोकादायक पध्दतीने प्रवास केल्याने सरकारतर्फे भा.दं.वि.स. कलम २६९, १८८प्रमाणे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला गेल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा सेवा ( शिस्त व आपिल ) नियम १९६४ मधील नियम ३ (१), (ब) मधील तरतुदी नुसार व प्रस्तावनेतील तरतुदीनुसार पुढील आदेशापर्यंत शिक्षक अजय केंद्रे यांचे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
"अजय केंद्रे हा शिक्षक भापट गावी आल्यापासून उपद्रवी व उद्योगी शिक्षक म्हणून प्रसीध्द होता, प्रत्येक ठिकाणी तो व्यवसायीक वृत्तीनेच काम करायचा दांडी बहाद्दर शिक्षक तो म्हसळ्यात तांदूळ व कर्जतला आंबे विकायचा , ग्रामस्थानी जमवीलेली रु१.५ लक्ष ची शाळेला रंग-रंगोटी केली त्याचा हिशोब ही देत नाही, निलंबनाची कारवाई योग्य आहे"
रवींद्र कुवारे, ग्राम पंचायत सदस्य. भापट
"अजय केंद्रे या शिक्षकाचे निलंबन योग्य आहे, तो तालुक्यात आल्यापासून ग्रामस्थ तक्रारी करत असत केंद्रे यांच्या कारवाईची मुळे म्हसळा पं.स. शिक्षण विभागाला मिळालेली ही चपराक आहे. म्हसळ्यासारख्या दुर्गम भागात कायम स्वरुपी गट शिक्षण अधिकारी असावा"
महादेव पाटील, ता. प्रमुख , शिवसेना
Post a Comment