संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
लॉकडाऊनच्या काळात म्हसळा तालुक्यातील ग्रामिण भागात असंख्य मुंबईकरांनी गावेच्या गावे भरली असून क्वारंटाइन केल्यानंतर काळजीपूर्वक एका खोलीत न रहाता एकमेकांच्या संपर्कात आल्याने मोजक्या बाधीत रुग्णाच्या संपर्कात इतर लोक आल्याने ग्रामिण भागात कोरोना फोफावत असल्याचे कालच्या दिनांक ३० मे च्या म्हसळा तालुक्याच्या आकडे वारीवरून समजते.२९ मे पर्यंत तालुक्यातील पोसोटीव्ह
रुग्णाची संख्या १० होती मात्र पुढील २४ तासांत आणखी १० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील पोसिटीव्ह रुग्णाची संख्या २० वर लोचली असून नजीकच्या काळात हा आकडा गुणाकार पद्धतीने वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान दिनांक ३० मे २०२० अखेर नव्याने सापडलेल्या रुग्णांत ठाकरोली २ एक मुलगी (वय-९ वर्षे),एक महिला (वय-२९ वर्षे)
पाभरे २ गायरोणे एक पुरुष (वय-३९ वर्षे),पाभरे एक मुलगा (वय-११ वर्षे).वारळ ५ एक मुलगी (वय-५ वर्षे), पुरुष (वय-३६ वर्षे),पुरुष (वय-२४ वर्षे),पुरुष (वय-६० वर्षे),एक मुलगी (वय-९ वर्षे), खरसई एक महिला (वय-७५ वर्षे मृत) तालुक्या- तील ग्रामिण भागात वाढत्या कोरोना +मुळे भीती निर्माण झाली आहे.तालुक्यात ३ रुग्ण मृत १७ कोरोना पॉझीटीव्ह आहेत.
Post a Comment