म्हसळा
भारत सरकारच्या विविध योजनांचे सानुग्रह अनुदान बँक ऑफ इंडिया मध्ये जमा झाली असून आपापल्या खात्यातील पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी बँक ऑफ इंडिया शाखा म्हसळा येथे फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.त्यामुळे सोशल सिस्टंसिंग ठेवणे गरजेचे असतानाही नियमांचे उल्लंघन करून म्हसळा येथे सोशल डिस्टन्सीन ची ऐशी की तैशी झाल्याचे म्हसळा येथे पहावयास मिळाले.
जनधन खात्यात केंद्र सरकारतर्फे पैसे जमा करण्यात आले असून हे काढण्यासाठी प्रत्येक खातेदाराला वेगवेगळ्या तारखा दिल्या असल्याने बँकेच्या समोर फार मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसत होते.लॉकडाऊन असल्याने बँकांमध्ये गर्दी न करता एकावेळी फक्त पाचच ग्राहकांना प्रवेश देण्याचा नियम असतानाही ग्राहक विनाकारण गर्दी करून नियमांचे उल्लंघन करीत आहेत.पैसे जमा झालेत किंवा कसे या बाबत बँकेने सूचना फलक लावणे गरजेचे असून केवळ चौकशी साठी ग्राहकांना दोन-दोन तास रांगेत थांबावे लागत असल्यानेही गर्दीचे प्रमाण वाढत आहे.
Post a Comment