म्हसळ्यात चाकरमानी माहिलेचा प्रवासात मृत्यू : अन्य प्रवाशाना करण्यात आले कॉरंटाईन


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
गेले काही दिवसां पासून मजुरांचे लोंढे आपापल्या गावाकडे परतणे सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पनवेल या परिसरांतून चाकरमानी पायी अथवा मिळेल त्या साधनाने कोकणात गावकडे येत आहेत. त्यातच काल पनवेल येथून येणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षीय महिलेचे प्रवासात मृत्यू झाल्याची घटना शनी. दि.१६ रोजी सायंकाळी घडली. पनवेल येथील Hotspot परिसरांतील कुटुंबातील ७ प्रवासी आपल्या गावाकडे येत असताना घरापर्यंत पोहचेपर्यंत त्यातील ६२ वर्षीय महिलेचा दुर्देवी अंत झाला. सदर महीलेला दमा, उच्च रक्तदाब पाहिल्या पासून असल्याचे मांत लगानी सांगताच घटनेचे गांभीर्य ओळखून मृत महिलेचे स्वॅब सँपल तात्काळ शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. महीलेच्या समवेत असणाऱ्या नात्यातील अन्य प्रवाशाना कॉरंटाईन करण्यात आले आसल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा