तळा (किशोर पितळे)
देशात कोरोना पसरत चाललेला असल्याने संपूर्ण देश २२मार्च पासून लाँकडाऊन व संचारबंदी केल्याने सर्व प्राकारची कामे बंद पडली त्यामुळे मोलमजुरी बंद झाली असून आर्थिक मंदी आली असून परराज्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच लाँकडाऊन मुळे अडकून पडलेल्या कामगारांना आपापल्या गावी जाण्याची शासनाने मान्यता दिल्याने परप्रांतीयांनी आँनलाईन अर्ज सादर केले.आज पहिली खास बस तळा तहसील कार्यालयातून पनवेल रेल्वे स्टेशन पर्यंत ९ मे. दुपारी दोन वाजता मा.जिल्हाधिकारी श्रीमती नीधी चौधरी कोरोना पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी आल्या असता त्यांच्या उपस्थित मध्यप्रदेशातील आठ कामगारांना पाठविण्यात आले. केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून येणाऱ्या आँर्डर नुसार त्या त्या परराज्यात जाणाऱ्या रेल्वेंं नियोजना प्रमाणे परप्रांंतीयाना पाठवण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या मार्फत जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक तालूक्यातून केली जाणार आहे त्या प्रमाणे आज पाठवण्यात आली तसेच राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी देखील सोय केली जाणार आहे. एस् टी महामंडळाच्या नियोजनाच्याप्रमाणे केली जाणार आहे. तसेच खाजगी किंवा स्वताःची गाडी असेल तर वैद्यकीय आरोग्य दाखला व परवाना देऊन जाता येईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
Post a Comment