लॉक डाऊन २ : म्हसळा पोलीस देत आहेत नागरिकांना धडे ; Evening Walk वाल्यांना दिली समज.


लॉक डाऊन २ मध्ये म्हसळा पोलीस देत आहेत नागरीकाना धडे : दुचाकी केल्या जप्त, Evening Walk वाल्याना दिली समज.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत कोरोना विषाणू रोगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन तसेच मा.जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने संचार बंदी आदेश लागू करण्यात आले आहे. असे असुनही म्हसळा शहरातील काही नागरिक संचार बंदीचे नियम झूगारून संध्याकाळी म्हसळा बायपासला फिरावयास जातात अशी माहिती म्हसळा पोलीसाना मिळाल्याने सपोनी धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोसई दिपक ठूस, हे.कॉ. गणेश भोईर, वैभव पाटील,पोना.श्यामराव कराडे,संतोष चव्हाण,सांगळे, राठोड, तोरसाळे, फोफसे, बहुरे, सानप ही टीम म्हसळा बायपास रोडला दाखल झाली, आज सायं .६.३० वा.रोडवर फिरत असलेल्या १५नाागरिकाना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 68 प्रमाणे त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
    लॉक डाऊन १ मध्ये वाहन चालकाना शिस्त, संचार बंदी बाबत कठोर कारवाई सोबत घरांत रहा सुरक्षित रहा या संदेशाचे पालन करण्याचे धडे दिले, आता लॉक डाऊन २ मध्ये वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई, नंतर दुचाकी जप्त ,आज Evening Walk वाल्या१५ नागरिकाना समज देऊन म्हसळा पोलीसानी सोडून देण्यात आले. हे केवळ आपणा सर्वांसाठीच कोरोना विषाणू (COVID-19) या रोगाची + रुग्ण जवळच्या श्रीवर्धन तालुक्यात सापडले आहेत ह्याची समज देण्यासाठी, लोक घराबाहेर पडतात म्हणून नाईलाजाने समज देण्यासाठी कारवाई करावी लागते असे सपोनी धनंजय पोरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा