तळा प्रेस क्लबच्या पाठपुराव्याने १०८अँम्बुलन्स सेवा सुरू.


तळा (किशोर पितळे)
तळा प्राथमिक आरोग्य केंद्राची १०८अँम्बुलन्स गेले सहा महिने बंद अवस्थेत असल्याची बातमी तळा प्रेस क्लबने पाठपुरावा केल्याने आरोग्य प्रशासनाला खडबडून जाग आल्याने त्वरीत बी.जी.व्हि. एजन्सी कंपनी कडून सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत रूग्णांना आरोग्य सेवा(जीवनदायी)अँम्बुलन्स दिली जाते.सद्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने संपूर्ण जगाला वेढले असताना पेशंटना तपासणीस नेण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध नाही.आरोग्य सेवा हि अत्यावश्यक सेवा म्हणून पाहिले जाते.गरोदर महिला,अपघात, सिरीयस पेशंट हार्ड अँटँक पेशंट अशा ना ताबडतोब माणगांव, अलिबाग, मुंबई येथे हलवायला लागते अशा परीस्थितीत नातेवाईकांची धावपळ उडते १०८ नं. गाडी नसल्याने पर्यायी व्यवस्था करणे भाग पडते मग आरोग्य सेवेचा लाभ काय? याबाबत आरोग्य प्रशासन व स्थानिक पातळीवर गांभीर्याने लक्ष घालत नव्हते. मात्र रायगड प्रेेस क्लब संलग्न तळा प्रेस क्लबने समस्याचे गांभीर्याने घेऊन१०८ नं अँम्बुलन्स सुरू करण्यात आली आहे.तरी नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा