प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा तालुक्यातील खरसई ग्रामपंचायतीच्यावतीने प्रत्येक कुटुंबास सॅनिटायझरचे वाटप करण्यात येऊन सर्व ग्रामस्थांनी घरी थांबा व काळजी घ्या, असे आवाहन सरपंच निलेश मांदाडकर यांनी केले.
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. खरसई ग्रामपंचायतीच्यावतीने दररोज कोरोनापासून जागृत करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच पुणे- मुंबईहून गावाला आलेल्याची यादी प्राथमिक आरोग्य केंद्रात देवून त्यांना तपासणी करण्यास लावणे व अनावश्यक कामासाठी घरातून बाहेर येवू नका, असे आवाहन केले जात आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ६४१ कुटुंबांच्या घरी जावून २१०० मास्क वाटप केले. संपूर्ण गावात दोन दोन फवारणी करून ग्रामस्थांच्यात जनजागृती केली.तसेच एक दिवसाचा विशेष जनता कर्फ्यु उत्स्फर्तपणे पाळण्यात आला,दुकानांच्या वेळा ठरवून गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेवीका,अंगणवाडी सेविका- मदतनीस,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक यांनी घरोघरी जाऊन माहिती घेऊन नागरिकांना आरोग्य विषयक माहिती देत आहे.
तसेच गावचे लोकनियुक्त सरपंच निलेश मांदाडकर, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक मुरलीधर जाधव, कर्मचारी भास्कर कांबळे आदींनी घरोघरी जावून सॅनिटायझर चे वाटप केले. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उत्तमरितीने पालन करुन ग्रामस्थ घरीच थांबून गावाबाहेरून येणार्यांवर नियंत्रन ठेवत आहे.
Post a Comment