फोटो- सासर्याच्या अंतविधिला पोहचण्यासाठी पायपिट करून म्हसळा येथे आलेले सून पार्वती हेमंत पाटील आपल्या लेकी सोबत दिसत आहे.(छाया-निकेश कोकचा)
म्हसळा(निकेश कोकचा)
कोरोणा विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार घातला असून महाराष्ट देखील याच्या विळख्यातून वाचू शकला नाही.कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाउन करण्यात आले असून संचारबंदी देखील करण्यात आली आहे.यामुळे संपूर्ण राज्यात सरकारी व खाजगी वाहतूक बंद करण्यात आली आहे.वाहतुक बंद असल्यामुळे सासर्याच्या अंतविधिला पोहचण्यासाठी सुनेने आपल्या सहा महिन्याच्या लेकीला घेऊन पनवेल ते म्हसळा तालुक्यातील मेंदडी अंतर पार केले.
पांडुरंग गोविंद पाटील यांचे दिनांक 4 एप्रिल रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाली.पाटील यांच्या निधंनाच्या वृत्ताने कुटुंबात सर्वत्र दु:ख पसरले होते.मात्र लॉकडाउन व संचारबंदी असल्याने पाटील यांच्या अंत दर्शनासाठी कुटुंबातील अनेकांना येता आले नाही. अशातच पाटील यांची सून पार्वती हेमंत पाटील यांनी सासर्यांच्या अंत दर्शनासाठी सरसावली असताना त्यांनी सासर्याच्या अंतदर्शनासाठी आपल्या सहा महिन्याचा लेकीला घेऊन थेट पनवेल ते मेंदडी अंतर गाठण्याचा निश्चय केला.यावेळी त्यांच्या सोबत पायी चालताना ईश्वरी हेमंत पाटील-नात (वय 4 वर्षे,) संचित हेमंत पाटील-नातू (वय 5 वर्षे) सिद्ध कृष्णा पाकोळी-नातू (वय-6 वर्षे) रमा देवनाथ वेटकोली-मेव्हणी हे देखील होते.पायी निघालेल्या या सर्वांनी वाहन मिळाले तर वाहनाने नाहीतर पायी पनवेल ते मेंदडी असा 130 किलो मीटर च अंतर पार केला.मात्र कोणाचीही वाट न पाहता पांडुरंग गोविंद पाटील यांचे शासनाच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.यामुळे त्यांची सून पार्वती हेमंत पाटील यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नाही.मात्र सासर्याच्या अंतिम दर्शनासाठी कसलीही पर्वा न करता पायपिट करून गावी येणार्या सुनेचा आपल्या सासर्याबद्दल आदर व प्रेम पाहून संपूर्ण तालुक्यातील नागरिकांच्या मुखातून धन्य ती लेक असे उदद्गार येत आहेत.
Post a Comment