महावीर जयंती निमित्त म्हसळ्यामध्ये जैन समाजाकडून १०० गरजूं कुटुंबांना अन्नधान्य वाटप


म्हसळा(निकेश कोकचा)
महावीर जयंतीचे औचित्य साधून जैन समाज व श्री. शांतीनाथ आदर्श जैन मंडळ,म्हसळा तर्फे ग्रामीण भागातील 100 गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
सोमवारी जैन धर्माचे २४वे तीर्थकार भगवान महावीर यांची २६१९ वी जयंती होती.देशावर कोरोनाचे संकट असताना व शासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने महावीर जयंती साजरी करण्यात आली नाही.मात्र या दिनाचे औचित्य साधत म्हसळ्यातील जैन बांधवांनी स्वखर्चाने मांदाटणे, भेकर्‍याचा कोंड व कुडगाव या ग्रामपंचायत हद्दीतील १०० कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभापति बबन मनवे, गट विकास अधिकारी प्रभे, स.ग.वी.अ प्रदीप डोलारे,ग.शी.संतोष शेडगे,जैन समाज अध्यक्ष सुरेश जैन,उपाध्यक्ष कांतीलाल जैन,समाजसेवक समीर बनकर,सरपंच चंदू पवार,चेतन जैन,खेतल जैन,तेजपाल जैन यांच्या सहित इतर ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थिती होते.जैन समजातर्फे गरजू कुटुंबाला धान्य वाटप करण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद सभापति बबन मनवे,गटविकास अधिकारी प्रभे यांनी त्यांचे कौतुक केले. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा