तळा तालुक्यात संत निरंकारी मंडळा कडुन जीवनावश्यक वस्तुंचे वितरण.


तळा (किशोर पितळे)
कोरोना विषाणुने जगात सध्या थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदीजींनी जनता कर्फ्यु जाहीर केला आणि लगेचच संपुर्ण देशामध्ये लाॅकडाऊन केले.या लाॅकडाउनमुळे मोलमजुरी करणारे तसेच ज्यांचे पोट हातावर आहे अशा नागरिकांचे उदर निर्वाह करणे हे थांबल्यामुळे गोरगरीब जनतेचे खुप हाल झाले आहेत. सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराजांनी संपुर्ण देशामध्ये गरजु कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्याचे आदेश दिले आहेत.रायगड झोन ४० (अ) अंतर्गत प्रत्येक शाखेमध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा चोरवली ता. तळा जिल्हा रायगड यांच्या वतीने चोरवली, गायमुख, तळेगांव, गणेश नगर, तळा, भानंग कोंड, कुडतुडी, कासेखोल, वांजळोशी, चरई, पाचघर, पिटसई, बार्पे, तारणे या गावांमधे जाऊन गरजु कुटुंबांना कांदे,बटाटे,तांदुळ,तेलमुगडाळ,तिखट,चहा, साखर ,मसाले,वाटाणे ईत्यादी जिवनाश्यक वस्तू चे वाटप करण्यात आले यावेळी चोरवली शाखेचे मुखी गणेश राणे,शांताराम नटे,प्रकाश उभारे,परशुराम अडखळे, शिवराम कदम,अशोक राणे उपस्थित होते.
      संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडुन आलेले आदेश तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझर ने हात स्वच्छ करणे,सामाजिक अंतर ठेवणे,अत्यावश्यक कामा व्यतिरीक्त घराबाहेर न पडणे अशा काही सुचना देऊन जनजागृती विषयी शांताराम नटे(गुरुजी) यांनी प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन केले.यावेळी सेवादलाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा