"खबरदारी हीच आमची जबाबदारी" खरसई ग्रामपंचायतीने पाळला आज जनता कर्फ्यू : होत आहे कौतुक


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासनाने लॉक डाऊन २ मे ३ पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आल्याने लॉक डाऊनच्या काळातच खरसई ग्रामपंचायतीने खरसई ग्रामपंचा- यत हद्दींत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला व संपूर्ण तालुक्याला आदर्श दिला.त्यामुळे खरसई ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश मांदाडकर ,आगरी समाज अध्यक्ष पांडुरंग खोत मुस्लिम समाज अध्यक्ष इमरान आकलेकर,कोळीसमाज अध्यक्ष रामजी भूनेसर बौध्दसमाज अध्यक्ष अनिल कासारे व या सर्वाचे नियोजन करणारे ग्रामसेवक मुरलीधर जाधव, आशावर्कर, आंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य सेविका, प्रा. शिक्षक, माध्यमिक शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.जनता कर्फ्यू चा कालावधी सकाळी ७ ते सायं ७ वाजेपर्यंत होते यामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डुंगी ,मोहल्ला ,कातळ आळी, मधली आळी, खालची आळी, कोळीवाडा, विद्यानगरी या सर्व भागातीत दुकाने छोटेमोठे व्यवसाय ग्रामस्थानी बंद ठेऊन सहकार्य केल्याचे सरपंच निलेश मांदाडकर यानी सांगीतले, आजच्या बंदच्या समितीत प्रा. शिक्षक, माध्यमिक शिक्षकांचा सहभाग होता त्यामुळे विद्यार्थानी बंदमध्ये सहभाग घेतला होता. आजच्या जनता कर्फ्यूत अंगणवाडी सेविका :अनिता शितकर,नाझनीन फकीर, अनिता मेंदाडकर, मालती शितकर,अंगणवाडी मदतनीस : बबिता पेरवी, व्दारका खोत, मनिषा खोत, सुचिता पयेर, विद्या पाटील ,आरोग्य सेविका: प्रविणा डांगारे, आशा वर्कर : निर्मला पयेर, हर्षला शितकर, निलम हेमंत पयेर,प्रा.शिक्षक : अशोक सानप, संदीप शेवांडे, दाऊद सोलकर, बंदरकर, बालाजी मडावी, माध्यमिक शिक्षक : मुख्याध्यापक मुलाणी सर, सातपुतेसर, आंबेडकर, भोसले मॅडम , काटेसर, नितीन पाटील,
ग्रामपंचायत : नारायण पयेर,भास्कर कांबळे, काशिनाथ कोकाटे.डाटा ऑपरेटर : गणेश मेंदाडकर या सर्वानी सक्रीय सहभाग घेतला होता.


"११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२० या कालावधीत गावातील २७ स्थलांतरीत ग्रामस्थ आपल्या घरांतील स्वंतत्र खोलीत विलगीकरण असताना आरोग्य विभागाचे मंडळीनी त्यांची आरोग्य विषयक चौकशी केली"मुरलीधर जाधव, ग्रामसेवक






"करोना संसर्गजन्य आजार असल्यानं झपाट्यानं फैलावत आहे. या आजारात मृत्यूचा दर अत्यंत कमी असला तरी, पसरण्याचा दर खूप जास्त आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री सांगत असताना गर्दी कमी करणं हाच प्रभावी उपाय ठरतो. याची आम्ही ट्रायल केली, लॉक डाऊन म्हणजे पौज बटणा सारखेच आहे याची जाणिव आम्हा ग्रामस्थाना झाली"

निलेश मांदाडकर, सरपंच खरसई

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा