संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरातील साळीवाडा भागातील कर्णिक गुरुजी यांचे बंद घर फोडण्याची घटना दि. १४डीसें २०१९ ते१३ मार्च २०२० या दरम्यान घडली होती, फिर्यादी निलेश रमेश कर्णिक यानी दि. १६ मार्च २०२० रोजी गुन्हा दाखल केल्यावरुन म्हसळा पोलीसानी गु.र.नं. ६ / २०२० भादवि सं.कलम ३८०, ४५४, ४५७ नोंदविला आहे. घरफोडीत कर्णिक यांचा घरातील गॅस शेगडी, सीलेंडर व रेग्युलेटर, इनन्हर्टर बॅटरी व मशीन, फिलीप्स कंपनीचा डी.व्ही.डी. प्लेअर, होम थीएटर, मिक्सर व कॅमेरा अशा एकूण रु १७ हजार ८०० रुपयाच्या वस्तू चोरट्या नी लंपास केल्याचे कर्णिक यानी फिर्यादेत म्हटले आहे. आपले घर बंद असताना मागील ३ महीन्या चे कालावधीत मागील . दरवाजा व कडी काढून घरफोडी झाली असावी असा अंदाज कर्णिक यानी आपल्या फिर्यादित व्यक्त केला. गुन्हा नोंदविला त्याच दिवशी म्हसळा पोलीसानी संशयीत आरोपी सुयोग संतोष कदम वय २१, रा. साळीवाडा, म्हसळा याला अटक केल्याचे तपासी अमलदार सुर्यकांत जाधव यानी सांगितले. गुन्हा नोंदविल्यापासून काही तासात म्हसळा पोलीसानी संशयीत आरोपीला जेरबंद केल्याने म्हसळा पोलीसांचे कौतुक होत आहे.
Post a Comment