दिवेआगरमधील पर्यटन बंद ठेवण्याचा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत पर्यटन व्यवसाय बंद

दिवेआगरमधील पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ठराव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत पर्यटन व्यवसाय बंद 

बोर्ली पंचतन : कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे . महाराष्ट्रामध्येदेखील याचा प्रसार झपाट्याने होत असून महाराष्ट्र शासनापासून भारत देश सध्या अलर्ट झाला आहे . महाराष्ट्र शासनाने बरीचशी सार्वजनिक ठिकाणे सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद केली असून शाळांनादेखील सुट्टी जाहीर केली आहे . यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ असणारे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पर्यटन व्यवसाय 31 मार्चपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय सोमवारी दिवेआगर येथे ग्रामपंचायत सभागृहामध्ये दालेल्या ग्रामस्थांच्या विशेष सभेमध्ये घेण्यात आला . तर दिवेआगर येथील होणारी सिद्धनाथ भैरव व केदारलिंग यात्राटेखील करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे . श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर नेहमी गजबजलेले पर्यटनस्थळ आहे दररोज शेकडो पर्यटक दिवेआगर व परिसराला भेट देत असतात. सध्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूने भारतामध्ये शिरकाव केला आहे . यामुळे कोरोना या विषाणूची लागण पसरू नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या दृष्टीने दिवेआगर येथील ग्रामपंचायतीनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे . दिवेआगर येथे पुणे , मुंबई व अन्य शहरांतून पर्यटक येत असतात . यासाठी सोमवारी ग्रामपंचायत सभागृहामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते . या सभेसाठी उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखी ठराव करीत 31 मार्चपर्यंत दिवेआगर गावामध्ये पर्यटन व्यवसाय पूर्णपणे स्थगित करण्यात येत असल्याचे ठरविले . यामध्ये कोणत्याही प्रकारे राहण्याचा तसेच बाहेरील फेरीवाले यांनादेखील गावामध्ये फिरण्यास मज्जाव करण्याचा ठरावही करण्यात आला आहे . या ग्रामसभेसाठी सरपंच उदय बापट , उपसरपंच समीक्षा पिळणकर , सदस्य गीता वाणी , सुहास मार्कडे , राकेश केळसकर , ग्रामसेवक शंकर मयेकर , माजी सभापती लाला जोशी , माजी उपसरपंच संजय पाटील किसन तोडणकर , प्रमोद तोडणकर देवेंद्र नार्वेकर , पर्यटन संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते . 

सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा रद्द
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील भक्तांचे आदरस्थान असलेली सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा ६ व ७ एप्रिल रोजी घेण्यात येणार होती ; परंतु सोमवारी सायंकाळी सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा कमिटीच्या विश्वस्त , कार्यकारी व सहकारी मंडळाची संयुक्त सभा घेण्यात आली . यामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रसार होऊ नये व ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हाधिकायांच्या सूचनेनुसार सिद्धनाथ व केदारलिंग यात्रा रद्द करण्याचा निर्णय सभेमध्ये घेतला आहे . भाविक व व्यावसायिकांनी यात्रा रद्द झाल्याची नोंद घ्यावी व दिवेआगर येथे येऊ नये , असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष अश्विन गन्द्रे यांनी केले आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा