प्रतिनिधी श्रीवर्धन
संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. चीनमध्ये तयार झालेला हा व्हायरस चीनमध्ये हाहा:कार माजवून आल्यानंतर फ्रान्स, इटली, इराण, अमेरिका, युरोप खंडातील काही देश याठिकाणी अक्षरशहा थैमान घालत आहे. भारत देशामध्ये देखील आजच्या घडीला या व्हायरसचे 650 रुग्ण आहेत. भारतात रुग्ण संख्या वाढू नये यासाठी मोठ्या प्रमाणावरती लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. याच धर्तीवर श्रीवर्धन नगरपरिषदेने नगरपरिषदे जवळ असलेल्या अग्निशमन वाहन घेऊन संपूर्ण शहरात सैनिटायजेशन सुरू केले आहे. सैनिटायजेशन करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी त्याचप्रमाणे श्रीवर्धन नगर परिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक अनंत गुरव स्वतः त्या वाहना बरोबर आहेत. श्रीवर्धन नगर परिषदेने हाती घेतलेला या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांकडून नगरपरिषदेला धन्यवाद देण्यात येत आहेत.
Post a Comment