खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
कोणत्याही परिस्थितीत इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ, त्यांना लॉकडाऊन पूर्ण होईस्तोवर परत पाठवणे शक्य होणार नाही.
महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील, शेतकरी आणि विशेषतः शेतीच्या कामासाठी ये जा करणाऱ्यांना अडथळा होणार नाही हे पाहावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा