महाड
संचारबंदीच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही या करिता योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड चे प्रांताधिकारी विठ्ठल नामदार यांच्या दालनात घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये बोलताना दिले आहेत .
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्य शासन व केंद्र शासन यांनी 14 एप्रिल 2020पर्यंत संचारबंदी लागू केली आहे .या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी घ्यावी अशा सूचना आमदार भरतशेठ गोगावले यांनी शुक्रवार 27 मार्च 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत .
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले ,प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार ,तहसिलदार चंद्रसेन पवार ,महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर जगताप ,महाड तालुका वैद्यकीय अधिकारी एजाज बिराजदार ,महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील , महाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद गोडांबे ,रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळ राऊळ , शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, युवा सेनेचे सिद्धेश पाटेकर ,महाड शिवसेना शहर प्रमुख नितीन पावले , आदी उपस्थित होते .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संचारबंदी लागू करणे झाली असली तरी या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी तसेच आदिवासी बांधवांना रेशन धान्य दुकानावर धान्य तात्काळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या .त्यासोबतच महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर जगताप तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव संदर्भात परिस्थितीचा आढावा घेतानाच त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात या करिता राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले .तर कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून संचारबंदीला सहकार्य करावे असे आव्हान आमदार भरतशेठ गोगावले यांनी या बैठकीमध्ये बोलताना केले .ग्रामीण भागातील जनतेला थेट भाजीपाला उपलब्ध करून देण्याकरिता योजना राबविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली .कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेला थेट त्यांच्या दारापर्यंत भाजीपाला उपलब्ध केला जाईल असा विश्वास आमदार गोपाल यांनी व्यक्त केला .कोरोना विषाणूंच्या महामारीमुळे सर्वसामान्य कामगार कष्टकरी जनता यांचे होणारे हाल रोखण्य करीता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी प्रशासनामार्फत तात्काळ करण्यात यावी अशा सूचना आमदार गोगावले यांनी केल्या. संचारबंदीच्या काळांमध्ये असहकार करणाऱ्या दुकानदार, डॉक्टर ,यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशा सूचना देखील आमदार गोगावले यांनी प्रशासनाला दिल्या .
जे नागरिक जिल्हाधिकारी रायगड ,पोलिस अधीक्षक रायगड ,यांच्या सूचनांचे पालन करीत नाहीत अशांच्या विरोधात कठोर कारवाई करणे ही काळाची गरज आहे असा इशारा आमदार गोगावले यांनी दिला आहे.
Post a Comment