रायगड - (धम्मशील सावंत)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणुन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे यांनी आपल्या आमदार निधीतून ५० लाख रुपये किंमतीच्या साधनसामुग्री देण्याचे सुचविले आहे.
आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ करीता असलेल्या विकासनिधीतून श्रीवर्धन मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेल्या तसेच, राज्याच्या मंत्रीमंडळातील युवा मंत्री म्हणुन काम करण्याची संधी मिळालेल्या राज्यमंत्री ना. कु. आदिती तटकरे यांनी एकुण ५० लाख रूपयांचा आमदार निधी हा मतदारसंघातील शासकीय रूग्णालयात आवश्यक असलेल्या साधनसामुग्रीसाठी वापरला आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत जात असून त्याला रोखण्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. अशावेळी मतदारसंघातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ना. तटकरे यांनी आपल्या आमदार निधीतून माणगाव, रोहा व श्रीवर्धन येथील उप जिल्हा रूग्णालयात आयसीयु व्हेंटलिटर व आयसोलेशन वाॅर्ड व्यवस्था, फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर आदी. वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहीत्य उपलब्ध करून देण्यासाठी खर्च केला आहे.
Post a Comment