नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे नियोजनाचे म्हसळयात होत आहे कौतुक


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. याकाळात जीवनावश्यक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी महसुल, पोलीस व नगरपंचायत प्रशासन संपूर्णपणे खबरदारी घेत आहे. या अनुषंगाने म्हसळा शहरातील नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देण्याचे नियोजन नगराध्यक्षा जयश्री कापरे यानी केल्याने त्यांचे शहरांत विशेष कौतुक होत आहे.
         कोरोना हा संसर्गातून पसरणारा आजार असल्याने भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी शहराच्या विविध भागामध्ये हातगाडी, छोटे टेम्पो अथवा गाडीच्या माध्यमातून भाजीपाला व फळे उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांची भाजी मार्केट मध्ये गर्दी होत नाही.सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतआहे. भाजी मंडईमध्ये नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी भाजीपाला, फळे नागरि कांचे घराजवळ भाजीपाला व फळे रास्त भावात मिळण्या साठी उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने दिले आहेत. या भाजी विक्रेत्यांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असून मास्क, हातमोजे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांनी भाजीपाल्याचा पुरवठा सुरू आहे याची कृपया नोंद घ्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गर्दी करु नये असेही आवाहन नगरपंचायतीमार्फत करण्यात येत आहे .

म्हसळा शहरातील भाजी विक्री सेंटर व ठीकाणे पुढील प्रमाणे
१.सानेआळी -मंजूर साने
२.दिघिरोड- शकील ( मामु )
३.साळीवाडा- अशोक अडागळे
४.शाहीन के जी शाळेजवळ - जमीर दळवी
५.कन्याशाळा- अनिल चव्हाण
६.इदगा परिसर, श्रीवर्धनरोड- खालिद करदेकर
७.नवानगर परिसर, श्रीवर्धनरोड- अनिश भालदार
८.खोंडा मोहल्ला- सलीम चांदले
९.नवानगर परिसर -दाउद घरटकर
१०. म्हसळा गौळवाडी- उत्तम वाठोरे


       या काळात किराणा मालाची दुकानेही नियमितपणे सुरु राहणार आहेत. सकाळी ८ते १२ व सायं ४ते ६ या वेळेत बाजारपेठेत किराणा व भाजी मिळेल.नागरिकांनी उगाचच घाबरून जाऊन साठा करून ठेवू नये. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी किरकोळ दुकानदार, व्यापारी यांनी नागरिकांना घरपोच किराणा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे तसेच नागरिकांनी थेट दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा आवश्यक सामानाची यादी तयार करून पाठवावी व दुकानदाराने दिलेल्या वेळी जाऊन सामानाची उचल करावी असे सूचित करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी जितक्या प्रमाणात गर्दी टाळणे शक्य आहे तेवढी गर्दी टाळावी व अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी घराबाहेर आल्यानंतर दोन व्यक्तींमध्ये 3 फुटाइतके सुरक्षित अंतर राखावे व नागरिकां च्याच आरोग्य हितासाठी नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा श्रीमती कापरे व नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा