म्हसळयात गुटखा विक्रेत्यांवर पोलीस व एफडीएची कारवाई


संजय खांंबेटे : म्हसळा प्रतिनिधी
गुटखा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून गुटका, सुगंधित तंबाखू असा केवळ एकूण ४ हजार ५२८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आसल्याचे पो.स.ई.दिपक डूस यानी आमच्या प्रतिनिधीला सांगीतले.एफडीए पेण रामचंद्र मारोतराव भरकळ यानी दिलेल्या फिर्यादी नुसार म्हसळा पोलीसानी गु.र.नं.५ / २०२० भारतीय दंड संहितेच्या कलम २७२ अन्वये (विक्रीयुक्त पदार्थामध्ये भेसळ करणे), कलम २७३ (अपायकारक व विषारी पदार्थाची विक्री करणे), कलम ३२८ (विषारी पदार्थ देऊन व्यक्तीला इजा पोहोचवणे) व १८८ (सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे) या कलमांखाली 'एफडीए'कडून आरोपीं विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवून चार आरोपीना अटक करून कारवाई करण्यात आली असल्याचे डूस यानी सांगितले.

"राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी, खर्रा इत्यादींची कोणीही विक्री करीत असेल तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखालीही गुन्हा नोंदवून फौजदारी खटला भरला जाऊ शकतो,राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे आदेश दिले असताना शहरातील बहुसंख्य शाळांच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे आशा ठीकाणी शाळा मुख्याध्यापक अगर शालेय व्यवस्थापन समितीने तक्रार दिली तरी संबधीत टपऱ्यांवर कारवाई होऊ शकेल."
धनंजय पोरे, स. पो.नी. म्हसळा पोलीस स्टेशन

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा