कोरोना.. दक्षता घ्या.. भीती नको..! सार्वजनिक आरोग्य विभागासह म्हसळ्यात प्रशासन सज्ज.



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी

करोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांच्या दालनात म्हसळा तालुक्यातील आरोग्य, ग्रामिण रुग्णालय, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षण विभाग नगरपं-चायत, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस विभाग, खाजगी वैद्यकिय व्यवसायीक, पॅथॉलॉजीस्ट यांची करोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय योजने बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश कांबळे यानी मागील १५ दिवसा पासून म्हसळा तालुक्यांत परदेशांतून आलेल्या नागरिकांची माहीती गोळा करण्याचे काम म्हसळा, मेंदडी व खामगाव प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सेवक, सेविका, आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येतआहे, शहरांत असणाऱ्या लॉज मध्ये परदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे का?लॉज व्यवस्थापनाकडून फॉर्म Cमध्ये माहीती संकलीत होते किंवा कसे याबाबत पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग सर्तक आहे. तालुक्यातील म्हसळा , मेंदडी व खामगांव प्रा.आ. केंद्रातील रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली, त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने करोना विषाणू संक्रमण प्रतिबंधात्मक उपाय योजना व जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील सर्व केंद्रांतील केंद्र प्रमुखाना केंद्रातील सर्व शिक्षकांच्या संर्पकांत राहून सर्तक राहण्याचे आदेश गट शिक्षण अधिकारी म्हसळा यानी दिले आसल्याचे सांगण्यात आले. करोना विषाणू संक्रमण ,त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना , जनजागृती व शाळेंतील विद्यार्थी, पालक याना या विषयी शास्त्रोक्त माहीती देणे, गाव पातळीवरील अफवा थांबवणे ही महत्वाची जबाबदारी केंद्र प्रमुख व शिक्षकांवर असणार आहे.

"तालुक्यामध्ये ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे व प्रा.आ. केंद्रातून २४X७ नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले, तपासणी (Screening ) केंद्र, विलगीकरण (Quarantine) केंद्र आणि पूर्णतः विलगीकरण (Isolation) सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे."
डॉ. गणेश कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी, म्हसळा,

" तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत, केंद्र शाळा, ग्रामसेवक , शिक्षक , आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून जनजागृती फलक लावणे, गाववाडी वर प्रत्यक्ष भेटी देऊन करोना बाबत जनजागृती करणे असे कार्यक्रम राबविणे सुरु केले आहे."
वाय.एन. प्रभे, गटविकास अधिकारी , पंचायत समिती, म्हसळा

"नागरिकांना आवाहन करोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मिडियावर पाठवू नयेत. विविध अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय या विषयीचे संदेश पुढे पाठवू नयेत."
शरद गोसावी,तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी . म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा