कायदा बनविणारे करतात सोशल डिस्टन्सचे उल्लंघन :गट विकास अधिकाऱ्यांबाबत नाराजीचा सूर.

        फोटो - पंचायत समितीच्या हॉल मधील सभा

संजय खांबेेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस यांचे शर्तीचे प्रयत्न कौतुकाचे असतानाच त्यांचे बरोबरीनेच याच लढाईत जीवाची बाजी लावून कोरोनाला धुडकावून लावण्यात महसूल विभाग .जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग ,उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, नगरविकास विभाग, शिक्षण विभागातील लोक सध्या स्वतःच्या जीवाची परवा न करता 24x7 काम करत आहेत. या सर्व अधिकाऱ्यानी आपल्या सर्व सभा/ बैठका सोशल डिस्टन्स ठेऊन घेण्याचे स्पष्ट संकेत असताना , किंबहुना त्या बाबतचे निर्देश V/C, What shop, E.mail व्दारे देण्याचे संकेत असतानाच , जागे अभावी सोशल डिस्टन्सचे कळत नकळत उल्लंघन होत आसते , करोना संसर्ग मियंत्रण पथकाचे म्हसळा तालुक्याचे प्रमुख गटविकास आधिकाऱ्यानी रवीवारी दि.२९ मार्च रोजी घेतलेल्या पंचायत समितीच्या हॉलमध्ये गटशिक्षण अधिकारी,केंद्र प्रमुख, ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक यांच्या बैठकीत सोशल डिस्टन्सबाबत उल्लंघन झाल्याची चर्चा प्रथम संबंधीतांत नंतर सोशल मिडीयावर झाली कायदा बनविणा-यानी कायद्याचे उल्लंघन करू नये अशी खुली चर्चा नागरिकांत सुरू आहे. याबाबत तालुका शिवसेना प्रमुख महादेव पाटील संबंधीतांकडे तक्रार करणार आहेत.

"जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक नियमानुसार एक मीटर किंवा तीन फुट प्रत्येक नागरिकांत अंतर असावे, म्हणूनच दुकानांच्या बाहेर ग्राहकांना  उभारण्यासाठी चौकट किंवा सीमारेषा आखून घ्या. भाजीपाला विक्रेते मेडिकल स्टोअर, किराणा दुकाने यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी तसेच ग्राहकांनी या निर्देशांचे पालन करावे. जेणे करून दोन व्यक्तींच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेवता येईल. लोक जितके एकमेकांपासून दूर असतील, तितकाच या विषाणूचा फैलाव कमी होत जाईल हे प्रामुख्याने बंधनकारक आहे"
महादेव पाटील,तालुका प्रमुख , शिवसेना


 म्हसळा तालुक्यातील साळविंडे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन व्यक्तींच्या मध्ये सुरक्षित अंतर ठेऊन भाजीपाला घेणारे ग्रामस्थ

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा