चित्रलेखाताई पाटील यांनी केले औषध फवारणी यंत्राचे वाटप

अलिबाग (अमोल नाईक) 
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकार मोठया प्रमाणावर प्रयत्न करीत आहेत. कोरोना विरोधातील या लढयात सरकारच्या मदतीला आपला शेतकरी कामगार पक्षदेखील उतरला आहे. ग्रामीण भागात परिसर निर्जंतूक करण्याची आवश्यकता असून यंत्रणा मात्र पुरेसी नसल्याने शेकाप महिला आघाडीच्या नेत्या नगरसेविका, सीएफटीआय ट्रस्टच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी औषध फवारणी यंत्रासह लिक्विडचे वितरण केले, माझ्या गावसाहित ४ तालुक्यांत यंत्र वाटप करून कोरोनाला आपल्या गावांतून हद्दपार करण्याची त्यांनी जणू शपथ घेतली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस मा. आमदार भाई जयंत पाटील यांच्या आदेशानुसार जनतेच्या मनातील राजा माणूस अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांतशेठ नाईक  आणि शेकापक्षाचे अनेक नेते गोरगरीब जनतेला अन्न-धान्य पुरवठा करून त्यांच्या जगण्याच्या आशा पल्लवित करत आहेत. आणि नवी दिशा दाखवत आहेत.  अन्न-धान्या सोबत आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक ग्रामपंचायतींना शेकाप मार्फत औषधसाठा, तसेच फवारणी यंत्र मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला असे स्तुत्य उपक्रम फक्त शेकापचं करू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा