कोविड-19- करोना विषाणू”काळजी करू नका.. काळजी घ्या !


1 ते 25 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन
जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर
 
टीम म्हसळा लाईव्ह
जे नागरीक  दि.1 ते 25 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे-
एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले नागरीक-1117, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरीक-334, घरामध्ये अलगीकरणात (Home Qurantine) असलेले नागरीक-678, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Qurantine) असलेले नागरीक-104.
उपचारानंतर बरे झाल्यामुळे मुंबई येथील भाभा हॉस्पिटल  मधून घरी पाठविण्यात आलेले नागरिक-01 या नागरिकाच्या तब्बेतीची स्थिती उत्तम आहे तर कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-1 असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे.
परदेशी प्रवास करुन परतलेल्या नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
 जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-29, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-12, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-17, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-15, तपासणी अंती ‘+’ ve  रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-02, ‘+’ ve रिपोर्ट असेलेले उपचारानंतर ‘-’ve रिपोर्ट आलेले नागरीक-01 तर सद्य:स्थितीत +ve रिपोर्ट असलेल्या नागरिकांची संख्या-01 अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा