तळा (किशोरपितळे)
महाराष्ट्र सरकारचे विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून राज्यात महीला अत्याचार विरोधात राज्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून तळा भाजप पक्षाचे वतीने आंदोलन छेडण्यातआले. याआंदोलनात महीला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा हेमाताई मानकर, तालुका अध्यक्ष कैलासजी पायगुडे उपाध्यक्ष हर्षद ठक्कर, युवा अध्यक्ष प्रशांत सकपाळ सरचिटणीस रमेश लोखंडे, शहर अध्यक्ष सुधिर तळकर सुरेश दादा शिंदे, राजश्री सोलम,दर्शना मंचेकर मोरेश्वर मनवल संदीप पाशिलकर, सुभाष पाशिलकर जयेंद्र पाशिलकर, गणपत बांद्रे वगैरे कार्यकर्ते, शेतकरी बांधव सहभागी झाले होते. सकाळी ११ते३पर्यंत आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष अँड महेश मोहीते,व महीला जिल्हा अध्यक्षा प्रितमताई पाटील यांच्या मार्गदर्शना खाली धरणे आंदोलनाचा पावित्रा उचलला आहे.
गेल्या महीनाभरात राज्यातील महीलांवरील अत्याचारात मोठे वाढ झाली आहे हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, अँसिड फेक, पुरावा नष्ट करण्यासाठी जिवंत जाळणे अशा घटना घडत असताना सरकारचा गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहीला नाही असे निवेदन म्हटले आहे. तसेच तालुक्यात नुकताच झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी याबाबत निवेदन तळा पोलीस ठाणे व तळा नायब तहसीलदार परमेश्वर खरोडे यांना सादर करण्यात आले.
Post a Comment