श्रीवर्धन शहर स्वच्छता अभियानात प्रथम आणण्याला प्राधान्य देणार :-. राज्य मंत्री कु .अदितीताई तटकरे
श्रीवर्धन(विजय गिरी ):- श्रीवर्धनचा खंडित झालेला बीच फेस्टिव्हल पुन्हा सुरवात करणार असून त्याची जबाबदारी मी आ. अनिकेत तटकरे यांच्याकडे सोपवत असल्याचे वक्तव्य खा. सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन भैरवनाथ मंदिर प्रांगणात सभेला संभोदताना केले.
श्रीवर्धन मधील खालचा जीवना स्मशानभूमी सुशोभीकरण उदघाटन, दांडा तरीबंदर स्मशानभूमी सुशोभीकरण, श्रीवर्धन भैरवनाथ मंदिराचे कंपाउंड व सुशोभीकरण, जीवनेश्वर तलावाचे ठिकाणी कारंजे बसवणे व अन्य सुशोभीकरण आदी कामाचे उदघाटन खा.सुनील तटकरे, व राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, दर्शन विचारे, इम्तियाज कोकाटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीवर्धनमध्ये पर्यटक तीर्थक्षेत्र व निसर्ग पाहण्यासाठी येतात त्यामुळे श्रीवर्धनच्या नजकातीत भर करण्याच्या दृष्टीने काम करत असताना जीवनेश्वर कुंडमध्ये कारंजे बसवण्याचे काम झालं आहे. आता तुमची लेक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झाली आहे. तुमच्या आशीर्वादाची शक्ती आदिती च्या पाठीशी इतकी मोठी आहे की माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य तिला श्रीवर्धन मतदार संघातून मिळालं आहे. राज्यातील सत्ता बदलेल अस कोणाला वाटलं नव्हतं पण भविष्य घडवण्याची किमया असणारे आदरणीय पवार साहेब यांनी चमत्कार केला आणि महा आघाडीचे सरकार या राज्यात आले. आणि त्या सरकार मध्ये काम करण्याची संधी अदितीला तुमच्या आशीर्वादाने मिळाली आहे.
माझ्या कोकणातील घरगुती व्यवसाय करणारे माझे बांधव यांच्याकडून वीज कर व घरपट्टी व्यवसाय कर म्हणून आकारकी जाते ती घरगुती कर म्हणून आकारणी करण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार असे वक्तव्य सुनील तटकरे यांनी यावेळी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन शहर स्वच्छ शहर आहे. यावेळी श्रीवर्धन नगरपालिकेला स्वच्छतेचा राज्यस्थारिय पुरस्कार प्राप्त व्हावा यासाठी लक्ष देणार असल्याचं मत आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. श्रीवर्धन मध्ये नाट्यगृह, महिलांसाठी व्यायमशाळा व प्रशिक्षण केंद्र आसव त्यासाठी जागा उपलब्ध करून ते उभारणार असल्याचं आश्वास यावेळी ना. आदिती तटकरे यांनी दिल.
Post a Comment