तळा शहरात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद ; मात्र दोन वेळा दुकाने बंदपाळावा लागल्याने व्यापारी नाराज : जनता त्रस्त


तळा : किशोर पितळे
बहुजन क्रांती मोर्चा तर्फे NRC,CAA,NPR,EVM विरोधात २९ जानेवारी रोजी पुकारलेल्या भारत बंद ला तळा शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मात्र ऐन बुधवारी आठवडा बाजाराच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली. तळा तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यात शेती शिवाय दुसरे उत्पन्नाचे साधन नसल्याने बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असतात दर बुधवारी भरत असलेल्या आठवडा बाजाराला तालुक्यातील खेड्यापाड्यातून बहुतांश नागरिक बाजारात खरेदीसाठी येत असतात अशातच भारत मुक्ती मोर्चा तर्फे बुधवार दि.२९ रोजी व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवण्यास सांगितल्याने अनेकांनी याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. गावठी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे देश आर्थिक मंदीचा सामना करीत असताना वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपली दुकाने बंद ठेवावी लागत असल्याने देशाची आर्थिक स्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे सरकार विरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनात व्यापारी व सामान्य नागरिक भरडला जात आहे . शुक्रवार दि.२४ जानेवारी रोजी सुद्धा दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवावी असे सांगण्यात आले होते त्याचे पालन करीत व्यापाऱ्यांनी अर्धा दिवस आपली दुकाने बंद ठेऊन सहकार्य केले होते मात्र पुन्हा २९ ला भारत बंद ची हाक देऊन व्यापाऱ्यांना पूर्ण दिवस आपली दुकाने बंद करण्यास सांगितल्याने व्यापारी वर्गाने आपली नाराजी व्यक्त केली त्यामुळे एकप्रकारे व्यापाऱ्यांवर बंद लादला जात असल्याचे पहावयास मिळाले. मात्र एस् टी बस वाहतूक सुरळीतपणे चालू होती.

"बहुजन  क्रांती मोर्चा ने भारतबंद आंंदोलन छेडले परंतु सामान्य जनता भरडली जात आहे किरकोळ दुकानदार वडापाव, चहा टपरी हातावर पोट घेऊन महागाईत जीवन जगत आहेत.बंद ठेवल्याने आर्थिक नुकसान होत आहे आज देश आर्थिक संकटात सापडला आहे.आर्थिक मंदी आवासून आहे बंद पाळून प्रश्न सुटणार आहे का?मोठी शहरात मात्र  व्यवहार चालू आहेत.
-रविभाऊ मुंढे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख" 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा