कायदेशीर प्रकियेनंतर सुवर्णगणेश मंदिरातील सोने परत मिळणार

सुवर्णगणेश मंदिरातील सोने परत मिळणार कायदेशीर प्रकियेनंतर दिवेआगर देवस्थानकडे सोने देण्यास गृहमंत्र्यांची सकारात्मक भूमिका 

बोली पंचतन : अभय पाटील 
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर सुवर्ण गणेशमूर्ती चोरी प्रकरणातील सोने देवस्थान ट्रस्टकडे देण्याच्या दृष्टीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे . रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष महेश पिळणकर , सदस्य उदय बापट , लाला जोशी व ग्रामस्थ यांनी यासंदर्भात श्रीगणेशाच्या सुवर्णमूर्तीचे सोने देवस्थानला परत मिळावे यासाठी राज्याचे गृहमंत्री ना , अनिल देशमुख यांची मुंबईत भेट घेतली आहे . रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे सवर्णगणेशाची मूर्ती प्रकटल्याने दिवेआगरची एक नवी ओळख जगासमोर आली . प्राचीन सुर्वणगणेश मूर्ती पाहण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांच्या रांगा दिवेआगर मध्ये लागत असत . काही काळातच पर्यटन क्षेत्र म्हणून दिवेआगरची प्रसिद्धी वाढत असताना २१ मार्च २०१२ रोजी दरोडेखोरांनी ही सुवर्ण मूर्ती दरोडा टाकून चोरली . दरम्यान दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले . ६ ऑक्टोबर २०१७ रोजी न्यायालयाने त्यांना शिक्षा देखील सुनावली . मात्र मूळ मूर्तीचे सोने सरकार दप्तरी जमा झाले आहे . या मर्तीमध्ये लाखो भाविकांच्या धार्मिक भावना दडल्या आहेत . त्याचबरोबर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली ही गणेशमूर्ती मूळ सोन्यात प्रतिकृती घडवावी अशी असंख्य भाविकांची मागणी पुढे येत आहे . त्यामुळे इथल्या खुंटलेल्या पर्यटन व्यवसायासही पुन्हा चालना मिळेल . व भाविकांची मूर्तीप्रति असलेली आस्था कायम टिकून राहील या सर्व बाबी गृहमंत्र्यांना अनिल देशमुख यांना देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी सांगितल्या , यावर गृहमंत्र्यांनी कायदेशीर बाबीपुर्ण झाल्यावर सोने परत करण्यास सकारात्मकता दर्शविली आहे.

कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच मूर्तीचे सरकार दप्तरी जमा असलेले सोने देवस्थानाकडे परत देण्यासाठीची सकारात्मक भूमिका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली असल्याची माहिती दिवेआगर सुवर्णगणेश देवस्थान गणपती देव पूजा नेमणूक ट्रस्ट अध्यक्ष महेश पिळणकर यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा