सचिन धाडवे : म्हसळा लाईव्ह
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही कुणबी समाज मंडळ कणघर यांनी दि.१९ जानेवारी २०२० रोजी संस्कार भवन हॉल बोरिवली येथे आयोजन केलेल्या वार्षिक स्नेह सम्मेलन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पध्दतीने पार पडला त्यामध्ये दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थी सत्कार सोहळा निराधारांना आधार उद्योजकांचा सत्कार आणि प्रथमच दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम हळदीकुंकू समारंभ असे कार्यक्रम पार पडले आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सौ.वेदांतीताई अनिकेतभाई तटकरे मा. प्रकशदादा सुर्वे (आमदार मागाठणे विभाग) मा.बबनजी मनवे ( रायगड जिल्हा परिषद सदस्य) मा. उज्वलाताई शरद सावंत (सभापती पंचायत समिती तालुका म्हसळे) श्री राजारामजी गावडे साहेब (अध्यक्ष कुणबी समाजोन्नति संघ म्हसळा मुंबई) मा. रिद्धीताई खुरसंगे (नगरसेविका प्रभाग समिती अध्यक्ष) मा.भास्करदादा खुरसंगे (माजी नगसेवक) आदी उपस्थित होते
Post a Comment