संजय खांबेेटे : म्हसळा प्रतिनिधी
प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेल्या निंदनीय वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा- श्रीवर्धन रस्त्यावर भाजपा कार्यकर्तानी पोस्टर्स घेऊन व जोरदार नारेबाजी करुन राहुल गांधींचा निषेध केला. तालुका अध्यक्ष रायकर यानी देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेल्या निंदनीय वक्तव्याबाबत राहुल गांधीनी माफी मागावी अशी मागणी करत राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, मंगेश मुंडे, लहु तुरे, समीर धनसे, तुकाराम पाटील, अनिल टिंगरे, राजा चव्हाण, सुनिल शिंदे, प्रसाद विचारे, भालचंद्र करडे, विजय पाष्टे, सुनिल विचारे, मनोहर जाधव, राजेंद्र चव्हाण, किशोर गुलगुले, रामजी टिंगरे, सुनील पाटील, घनश्याम जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment