ठाकरोली विभागाने आता उठवू सारे रान विनोदी नाटकातून केली समाजजनजागृती

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
   मुंबई-  दि- १५ डिसेंबर २०१९ रोजी मराठी साहित्य संघ मुंबई गिरगाव या ठिकाणी ठाकरोळी विभागाच्या उन्नतीसाठी सध्या स्थितीत ग्रामीण राजकारण आणि समाजकरण यावर आधारित धम्माल हाऊसफुल्ल विनोदी नाटक आता ऊठवू सारे रानं लेखक/दिग्नदर्शक सुनील माळी. यांच्या प्रस्तृत हा.आनंद ऊत्सव हजारोंच्या कुणबी बांधवांच्या उपस्थित पार पडला
                 या सामाजिक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रमेश शिंदे. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे. मा.आ.श्री विनोदजी घोसाळकर ऊद्योजक निलेशभाई पंड्या, कुणबी संघाचे उपाध्यक्ष बबन उंडरे .मुंबई तालुका अध्यक्ष राजाराम गावडे, सचिव महेशजी शिर्के , उपाध्यक्ष गजानन शिंदे , युवक अध्यक्ष अनिल काप, कृष्णकांत गजमल ,शंकर तिलट्कर,विभागीय अध्यक्ष रमेश शिंदे, संतोष घडशी ,नथुराम भुवड ,सचिव सदानंद आग्रे ,ग्रामीण विभागिय अध्यक्ष दिलीप मांडवकर ,उपाध्यक्ष मोहन शिंदे ,सेक्रेटरी राजाराम तीलटकर ,दानशूर समाज सेवक नथुराम कताळे , राजु जाधव,अनिल बांद्रे ,नथुराम घडशी,प्रमोद शिंदे ,जयंत चिबडे,जनसामान्यांचे देवदूत प्रदीप मोगरे रामचंद्र खेरटकर ,सुभाष जाधव ,विनायक खेरटकर, जयसिंग बेटकर ,सुनील शेडगे,महेंद्र जाधव ,संदीप मोरे ,प्रमोद कापडी,संजय जाधव,महेंद्र घडशी,भरत बांद्रे ,अमर शिंदे,प्रशांत घडशी , सुरेश कुळे,मनोज नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
                            कार्यक्रमाचे प्रास्ताविक  श्री.रमेशजी शिंदे यांनी मांडले ठाकरोली विभागाच्या वतीने भविष्यातील जनजागृती मेळाव्याचे ग्रामीण ठिकाणी आयोजन होणार याची माहिती दिली.तसेच या मेळाव्याच्या अनुषंगाने शैक्षणिक उपक्रमाला चालना देण्यात येणार आहे . त्याच बरोबर विभागीय सभागृह भूमिपूजन करण्यात येणार याची माहिती प्रस्ताविकेत सांगितली.
                                   कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री.आमदार विनोदजी घोसाळकर यांनी सांगितले की,कुणबी समाज ठाकरोली विभागाचे आता उठवू सारे रान या कार्यक्रम च्या माध्यमातून लोक जनजागृती करत आहात हे कार्य मोठे कौतुकास्पद आहे . याच्यासाठी या विभागातील तरुणांनी घेतलेला वसा हा भविष्यातील पिढी साठी मार्ग देणारा आहे .माझे नेहमी या विभागासाठी सहकार्य असेल असे मनोगतात सांगितले . 
                                मुंबई तालुका अध्यक्ष श्री.राजाराम गावडे यांनी सांगितले सामाजिक कला , क्रीडा ,सांस्कृतिक आर्थिक क्षेत्रात ठाकरोली विभागाची दिशा गतिमान आहे . नेहमी तालुक्यातील चार विभागांपैकी ठाकरोली विभाग हे  सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे . अशी थाप तालुका मुंबई अध्यक्ष गावडे यांनी दिली.
                     आता उठवू सारे रान या कार्यक्रमातून संदेश चांगला देण्यात आला ग्रामीण ठिकाणी जमीन विकून शहराकडे स्थलांतर होत आहेत गाव ओसाड पडत आहेत ,शाळा बंद होत आहेत .आशा परिस्थिती कोकणातील लोकांनी काय करायला पाहिजे. तसेच नाटकातून    सुद्धा चांगला बोध देण्यात आला आहे त्यात आंबा ,काजू व इतर फळझाडे  लावून शेतकऱ्याला फळझाडे शेती कशी सुरुवात करून द्यायची तसेच उपलब्ध मार्केट करून द्यायचा आणि शेतकऱ्याला  त्याला स्व:ता पायावर कसे उभे रहायचे  आणि शेती विकान्यापासून शेतकर्याला  थांबवायचे कसे शेतकऱ्याला आदर्श शेतकरी बनवण्याचे स्वप्न उभे करायचे या नाटकातून संदर्भ देण्यात आला.त्याच बरोबर गावागावात, समाजात घरातील परिवारात राजकारणापासून  होणारे वाद यावर अत्यंत सुंदर चित्र उभे या नाटकातून ग्रामिण स्तरावरचे चित्र सादर केले. या कार्यक्रमाला ठाकरोली विभागातून भरभरून साथ मिलाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभागाचे सल्लागार राजु जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन विभागाचे सेक्रेटरी सदानन आग्रे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा