श्री.नवयुवक विकास संघटना चिराठी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

जयसिंग बेटकर : म्हसळा
               म्हसळा तालुक्यातील चिराठी गावातील श्री. नवयुवक विकास संघटना चिराठी यांच्या एकतेने सन २०२० ची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. संघटनेचे उद्दिष्ट सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा या क्षेत्रांना प्राधान्य देत चिराठी गावाने विकासाची गंगा साधत तरुणांच्या संघटितपणाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे.
                   नुकतेच आंग्रेवाडी, गिरगाव, मुंबई या ठिकाणी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी चिराठी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सहदेव मांडवकर, उपाध्यक्ष शांताराम अलिम, मार्गदर्शक सुर्यकांत चव्हाण, सुनील शेडगे, संदेश मोरे, मनोहर जाधव, श्री. नवयुवक विकास संघटना अध्यक्ष  संकेश मोरे, उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, नितीश नाचरे, सचिव राजेंद्र वाघे, सहसचिव अभिषेक मोरे, आत्मेश वाघे, खजिनदार पुर्वेश मोहिते, राजेश मोरे, संपर्कप्रमुख प्रदिप मोरे, नरेश अलिम, विनोद वाघे, विकास मांडवकर, शैलेश शेडगे, संदेश मोरे, अशोक चव्हाण आणि गावातील ज्येष्ठ वरिष्ठ यांच्या उपस्थितीत दिनदर्शिका प्रकाशन चांगल्या जल्लोषात साजरे झाले.
                     "चिराठी गावातील एकता ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. या श्री. नवयुवक विकास संघटनची स्थापना २०१३ मध्ये झाली. या संघटनेमार्फत हनुमान मंदिर जिर्णोद्धार आर्थिक सहाय्य, प्रवेशद्वार आर्थिक सहाय्य, रा.जि.प. प्राथमिक शाळा चिराठी डिजिटल युक्त करण्यासाठी शैक्षणिक सहकार्य, क्रिकेट सामन्यांचे आयोजन, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दिर्घ आजारी व्यक्तींना आर्थिक मदत, सामाजिक प्रबोधन, विद्यार्थी गुणगौरव, विद्यार्थी करियर मार्गदर्शन शिबिर आदी कार्यक्रम संघटनेच्या मार्फत गेली ५-६ वर्षात राबविण्यात आले."
- श्री. सुर्यकांत नावजी चव्हाण
(माजी अध्यक्ष नवयुवक विकास संघटना चिराठी)

                    श्री. नवयुवक विकास संघटना चिराठी यांच्या संकल्पनेतून आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२० दिनदर्शिका प्रकाशन, या दिनदर्शिकेसाठी चिराठी गावातील ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुणांनी तसेच समाजातील, तालुक्यातील होतकरू बांधवांनी अनमोल सहकार्य केल्याबद्दल मी संघटनेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.  सर्वांनी केलेले बहुमोल सहकार्य आम्हांला नक्कीच प्रेरणादायी आहे.
- श्री. संकेश गोविंद मोरे
(अध्यक्ष श्री. नवयुवक विकास संघटना चिराठी)

                     या कार्यक्रमासाठी उपस्थित होतकरू बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव राजेंद्र वाघे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत सहसचिव आत्मेश वाघे यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव अभिषेक मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष मंगेश चव्हाण यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा