श्रीवर्धन- दिवेआगर पर्यंटकानी केले जाम ; म्हसळयात मात्र वाहतुक कोंडीने काढला पोलीसांचा घाम.

श्रीवर्धन- दिवेआगर पर्यंटकानी केले जाम : पर्यटन व्यवसाय तेजीत ; म्हसळयात मात्र वाहतुक कोंडीने काढला पोलीसांचा घाम.

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
श्रीवर्धन, श्री क्षेत्र हरीहरेश्वर, दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर येथे मोठया संखेने येणारे देशी - विदेशी पर्यटकांची होणारी डिसेंबर ऐल्डींगची व विकएन्ड गर्दी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिघीबंदर, तुरूंबाडी येथील दास प्रकल्प येथे जाणारी व येणारी व्यापारी अवजड मालाची वाहतुक या दोनही प्रकाराने म्हसळा कराना सततच्या वाहतुक कोंडीला व त्यातून होणाऱ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे. तर दुसऱ्या बाजूने संखेने,अनुभवाने कमी असलेल्या पोलीसांचा मात्र घाम निघत आसल्याचे दृश्य आहे.
म्हसळा येथील ट्रॅफीक जॅमची समस्या ही आता सोडविण्या पलीकडची झालेली आहे , याला नगरपंचायत व पोलीस प्रशासन जास्त जबाबदार आहे असे नागरिकांचे मत होत आहे.शहरातील स्थानिक पादचारी, जेष्ठ नागरिक , महीला वर्ग या सर्वाना दिवसें दिवस शहरांतील मुख्य रस्त्यावरून बाजारहाट करण्यासाठी बाजारांत चालणेही दुरापास्त झाले आहे.म्हसळा शहरांतीत रस्ते सातत्याने वाढणाऱ्या वाहातुकीमुळे सतत ट्रॅफीक जॅमच्या समस्येत आडकत आहे. म्हसळा बाजारपेठ २५ वर्षापूर्वी केवळ ५०० मीटरच्या मुख्य रस्त्यावर व २०० मीटर अंर्तगत रस्त्यांवर होती.आता मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ ही सावर फाटा ते दिघी नाका, दिघी नाका ते सकलप फाटा आणि दिघी नाका ते ताज बेकरी असे तब्बल ४ ते ५ कि.मी. व अर्तगत बाजारपेठेची कक्षासुध्दा त्याच पटीने वाढली आहे. तेवढयाच संखेने शहरांत फेरीवाले, प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा व त्यांचे स्टँड( थांबे), माल वाहतुकीची साधने यांच्या संखेत प्रचंड वाढ झाली आहे. याच बरोबर अनधिकृत पार्कींग, मोकाट गुरे व कुत्र्यांचा त्रास होत आहे. ह्या सर्वांचा ताण ट्रॅफीक जॅम वर होत आहे.
म्हसळ्यात पोलीस प्रशासन करते काम परंतु नगरपंचायत विसरते काम !
म्हसळयात दोन ट्रॅफीक पोलीस सतत ट्रॅफिक मोकळी करत असतात त्यांची संख्या कमी पडत आसल्याने वरीष्ठ कार्यालयाकडे सतत मागणी करूनही ती संख्या वाढत नाही. परंतु ट्रॅफीक पोलीस कमी पडल्याने त्याने म्हसळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी सतत मदत करीत असतात.वरीष्ठ अधिकारी किंवा ट्रॅफीक विभाग ट्रॅफीक पोलीसांची संख्या का वाढवत नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
दुसऱ्या बाजूने म्हसळा शहरात ग्रामपंचायतीच्या जागी नगरपंचायत अस्तीत्वात येऊन ४ वर्ष झाली. करवाढी व्यतीरीक्त म्हसळा शहरातील वाहतुक सुकर व्हावी म्हणून काहीही प्रयत्न केले नाही.
खालील गोष्टी नगरपंचायतीकडून व्हाव्यात अशी भागरीकांची अपेक्षा आहे.
१)म्हसळा नगरपंचायतीने टू व्हिलर पार्कींग ची सुविधा सुरु करावी
२) रिक्षा प्रवासी वाहतुकीचे थांबे व वाहनांची संख्या निश्चित करावी
३)अनधिकृत टपरी व हातगाडी वाल्याना योग्य जागा देणे
४) अंर्तगत रस्त्यांचा छोटया वाहनांसाठी वापरा बाबत आभ्यास करणे (One Way बाबत)
५) मोकाट गुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे काळात असणारा कोंडवाडा कार्यरत करावा.

जाहिरात 

"जिल्हा पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन यांच्या मार्फत नगरपंयायत प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार केला, त्यांच्या कडून पोलीस प्रशासनाला सहकार्य मिळत नाही ."
अश्वनाथ खेडकर , पोलीस निरीक्षक . म्हसळा.

"श्रीवर्धन आगारांतून मुंबई व लांब पल्ल्याला जाणाऱ्या गाडया बायपास्टने जाव्या, लोकल गाडया गावातून सोडाव्या, तसेच येणाऱ्या सर्व गाडया गावांतून याव्या ."
दादा विचारे , निवृत्त कंडक्टर.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा