विहिरीतून पाणी काढणारा अनोखा पदपथ म्हसळा विज्ञान प्रदर्शनात भविष्यवेधी बालसंशोकांचा वीज प्रकल्प लक्ष्यवेधी
● राज्यस्तरीय स्पर्धेमधून राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात पुणे येथे निवड
● फुटपाथवरून चालणाऱ्या माणसाच्या पावलाच्या दाबाने काढता येणार पाणी
म्हसळा : महेश पवार
विद्याथ्यांच्या वैज्ञानिक बुद्धीला चालना देण्यासाठी शासनाने विज्ञान प्रदर्शन संकल्पना अंमलात आणून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याचे उपक्रम वेळोवेळी हाती घेतले आहेत . या उपक्रमात विविध संकल्पनेतून विद्यार्थी - शिक्षक एकत्र येऊन त्यांनी त्यांच्या कौशल्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केले . त्यातील विहिरीतून पाणी काढणारा पदपथ हा प्रकल्प सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता . चालणे हा चांगला व्यायाम प्रकार आहे . चालल्याने आपली बरीच उर्जा खर्च होते . पण याच खर्च होणाऱ्या उर्जेचा वापर आपण विहिरीतून पाणी काढण्यासाठी केला तर ? याच गोष्टीची विचार करून तालुक्यातील सालविंड़े देवळाची वाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी राज मोहिते , वैभवी पवार व शिक्षक संदीप जाधव , संकल्पना भगवान सोनावणे यांनी फुटपाथ तयार केला . ज्यावर चालल्याने आपल्याला विहिरीतून पाणी काढता येऊ शकते . जेव्हा आपण या फुटपाथवरून चालतो तेव्हा पदपथाखालील हवेचे पंप दाबले जातात व हवा विहिरीतील हवाबंद टाकीत साठविली जाते . जसजशी या टाकीत हवा जमा होते , तसा या टाकीतील हवेचा दाब वाढत जातो व ते पाण्याला ढकलण्याचा प्रयत्न करतो . पण पाण्याला जाण्यासाठी कुठेच जागा नसल्याने ते पाणी वर बसविलेल्या पाईपमधून बाहेर येईल . याचे कारण म्हणजे , या टाकीत हवेचा दाब वाढल्याने हवा तो दाब पाण्यावर टाकते . पाण्याला बाहेर जाण्यसाठी कुठेच रस्ता नसल्याने ते पाणी पाईपद्वारे बाहेर येते . या पदपथाचा वापर करून आपण शाळा , कॉलेज , दवाखाना सार्वजनिक ठिकाण , रेल्वे स्टेशन एसटी स्टैंड , मंदिर इत्यादी ठिकाणासाठी आवश्यक असणारे पाणी विहिरीतून अथवा कुपनलिकेतून काढण्यसाठी केला जाऊ शकतो . हवेचा दाब या संकल्पनेवर व हवेच्या गुणधर्मावर आधारित हा प्रकल्प आहे . चालल्याने वाया जाणाऱ्या स्नायू उर्जेचा वापर केला जातो . हा एक शून्य उर्जा खर्च असणारा प्रकल्प असून पर्यावरणपूरकसुद्धा आहे . हा प्रकल्प रत्नागिरी जिल्हयातील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आला होता . त्याठिकाणी परीक्षकांनी या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवर पुणे येथे निवड करण्यात आली . त्यामुळे प्रकल्प परिपूर्ण असल्यामुळे त्या प्रकल्पाला वैज्ञानिक शास्त्रज्ञ पुढे चालना देत हा प्रकल्प जनहिताचा ठरवू शकतो . त्याचबरोबर या विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा यांचादेखील विनाखार्चिक घर बँका अन्य ठिकाणी सुरक्षेतेचा वापर करणारा प्रकल्प विद्यार्थी व त्याचे शिक्षक एम . डी . हिरवे तर टाकाऊ कचऱ्यापासून उर्जानिर्मिती करणे तसेच अली कौचाली हायस्कूल पांगळोली यांनी तर फाय फाईट अलार्म म्हणजे घरच्याच भोवताली छतावर विनाखर्चिक अग्निक्षमन यंत्र पूर्वकल्पना देणारा गजर तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षक जवाद यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प मांडण्यात आला होता . विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून ५५ प्रकल्प तर माध्यमिक विभागाकडून १९ प्रकल्प प्राथमिक विभाग शिक्षक यांच्याकडून ५ प्रकल्प व माध्यमिक विभाग शिक्षक यांच्याकडून ३ प्रकल्प त्याचबरोबर प्रयोग शाळा सहाय्यक यांचाकडून १ प्रकल्प असे एकूण ८३ प्रकल्प सादर केले होते . यांच्या समवेत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र त्यांच्यामध्ये ५ शाळेने सहभाग घेऊन त्यांचे १५ उपक्रम सादर केले होते . अशामुळे ह्या उपक्रमात विद्याथ्यांसह पालक , शिक्षक , नागरिक यांना विविध संकल्पना पाहण्यासाठी सोयीचे झाले होते .
चालण्याने निर्माण होणाऱ्या उर्जाचा वापर करून आपण विहिरीतून पाणी काढू शकतो . ह्याचा गावात शेतकरी मळ्यात , शेतीत , घरच्या वापरासाठी तसेच शाळेतील बागेत याचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल . तसेच हा प्रकल्प कमी खर्चात व शून्य मेंटेनन्समध्ये करता येईल.
संदीप जाधव , प्राथ . शाळा शिक्षक , सालविंडे
म्हसळा तालुक्यासह शिक्षण विभागाचा तसेच जिल्हाचा सन्मान या प्रकल्पाने उंचावला आहे . त्यामधून विद्यार्थ्यांना सर्वच विषय ज्ञानाची उत्तम ओळख घेता येईल . राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत या प्रकल्पाची निवड झाल्याने यातून सर्वांनाच आदर्श घेण्यासारखे आहे.
संतोष शेडगे , गटशिक्षण अधिकारी , पं . स . म्हसळा
Post a Comment