राजिप शाळेचे संदिप जाधव राज्यात प्रथम राष्ट्रीय स्तरावर निवड


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व अगस्त्या इंटरनॅशनल फौंडेशन द्वारा आयोजित जिज्ञासा -2019 हे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन चिपळूण रत्नागिरी येथे 4 व 5 डिसेंबर 2019 ला पार पडले. प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक या तीन गटात राज्यभरातून जवळपास एक हजार पेक्षा जास्त प्रकल्पाची या प्रदर्शनासाठी नोंद झाली होती. त्यापैकी 200 प्रकल्पाची निवड करून त्या प्रकल्पचे प्रदर्शन चिपळूण येथे आयोजित केले होते. यामध्ये प्राथमिक गटात राजिप शाळा साळवींडे च्या तेजस मिसाळ व राज मोहिते यांच्या तर राजिप शाळा खारगाव खुर्द च्या वैष्णवी मेंदडकर व विशाखा म्हात्रे यांच्या प्रकल्पाची निवड झाली तर शिक्षक प्रकारात साळवींडे शाळेच्या श्री.संदिप जाधव यांची निवड झाली होती. 
     या स्पर्धेत सहभागी झालेल्या शिक्षक गटामध्ये राजिप शाळा साळवींडे चे शिक्षक श्री.संदिप जाधव यांच्या शैक्षणिक साहित्याला राज्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याबद्दल त्यांना राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक मा.डॉ. अवसारे साहेब व अगस्त्या फौंडेशन च्या मान्यवरांच्या हस्ते गोल्ड मेडल, ट्रॉफी व 7 हजाराचा चेक देऊन गौरविण्यात आले आहे. याच बरोबर विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गटात राजिप शाळा साळवींडे व खारगाव खुर्द च्या प्रकल्पाची आयसर पुणे येथे 18 व 19 डिसेंबर 2019 ला होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
        यासाठी राजिप शाळा साळवींडे चे मुख्याध्यापक सोनुने सर, अकोलकर सर व जाधव सर यांचे तर खारगाव खुर्द चे मुख्याध्यापक सुतार सर, बोर्ले मॅडम, जाधव मॅडम व बाबर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प सादर करण्याची संधी मिळत असल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे. तालुक्याच्या सभापती म्हात्रे मॅडम, उपसभापती श्री. संदिप चाचले साहेब, गशिअ शेडगे साहेब, केंद्र प्रमुख खामकर सर व ठाकूर सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा