संजय खांबेेेटे : म्हसळा प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील श्रीवर्धन- म्हसळा-तळा तालुक्यात मागिल ७ वर्षांत आमसभा झाली नाही . पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायतराज समितीच्या शिफारशी नुसार दरवर्षी आमसभा घेतली जावी असे संकेत आहेत. या तीनही गटविकास अधिकाऱ्यानी या संकेत वजा नियमांचे उल्लंघन केले अशी विरोधकांची चर्चा आहे .
तालुक्याची आमसभा पंचायत समितीच्या गट विकास आधिकाऱ्यानी व जिल्ह्याची आमसभा जिल्हा परिषदेच्या मु. का.अ.यानी पालकमंत्री यांच्या जवळ सुसंवाद करून लावावी असे संकेत आहेत.
पंचायत राज समितीने १९७६-१९७७ च्या आठव्या अहवालातील शिफारशी नुसार ९ मे १९७८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समित्याना आर्थिक वर्षाची सुरवात होण्या अगोदर प्रत्येक स्तरावर आमसभा घ्याव्यात असे बंधनकारक केले आहे. या सभांमध्ये कोणते विषय चर्चेला घ्यावेत या संर्दभात संसद सदस्य, विधानसभा सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींकडून सूचना मागऊन घ्याव्या व त्या अनुषंगाने सभेचे कामकाज करावे अशी शासनाची अपेक्षा आहे.पंचायत समितीची आमसभा जिल्हापरिषदेच्या आमसभेपूर्वी १ महीना अगोदर घ्यावी. त्यात जिल्हा परिषदेच्या कार्य क्षेत्रातील झालेले निर्णय व लोकप्रतिनिधीनी केलेल्या सूचना जिल्हा परिषदेकडे कळवाव्या ,जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यातून पंचायत समितीच्या आमसभेतून आलेल्या सूचनांचा आभ्यास करून जिल्हा परिषदेने आपला पुढील वर्षाचा कार्यक्रम निश्चित करावा असे या मागिल पंचायतराज समितीचे धोरण असताना श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील श्रीवर्धन, म्हसळा व तळा या तीनही गटविकास अधिकाऱ्यानी पंचायतराज आदेशाचे पालनच केले नसल्याचे दिसते .
तालुक्यातील विविध विकास कामाचे प्रस्ताव अभ्यासूपणे आमसभेत प्रारीत करून त्यासाठी विविध स्तरावरील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून निधीची व्यवस्था करून जनहिताची कामे होत असतात यासाठी विकास कामांचा व त्यावर खर्ची घातलेल्या निधीचा माहीतीचा बोर्ड लावणे , कामावर दक्षता कमेटीची नेमणूक करणे , कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमसभेपुढे पुरावे सादर करणे नागरीकांचे कर्तव्य आहे, त्यामुळे विकास कामात पारदर्शकता येते. यासाठी ग्रामसभा आमसभाचे आयोजन वेळेवर होणे महत्वाचे असते.
या पूर्वीची तळा पंचायत समितीची आम सभा २डीसें.२०१२ ला आणि श्रीवर्धन व म्हसळा पंचायत समितीची आम सभा ३ डीसें.२०१२ ला झाली होती.मागिल ७ वर्षांत आमसभा झाली नाही हे धक्कादायक पुढे येत आहे.
"तळा पंचायत समितीची मागिल आमसभा रडीसें.२०१२ रोजी झाली होती, या वर्षीचे आम सभेचे नियोजन येत्या काही दिवसांत करणार आहोत".
-व्हि .डी . यादव .ग.वि.अधिकारी पं.स. तळा
"श्रीवर्धन पंचायत समितीची आमसभा ३ डीसें.२०१२ रोजी तत्कालीन पालकमंत्री व श्रीवर्धन विधान सभेचे आमदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षते खाली झाली होती.त्यानंतर अद्याप पर्यंत आमसभा झाली नाही"
मधुकर केदार,कक्ष अधिकारी पं.स. श्रीवर्धन
"चा पूर्वीची म्हसळा पंचायत समितीची आमसभा ३डीसें.२०१२ रोजी झाली होती, मा.आमदार आदीती तटकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तालुका आमसभेचा प्रस्ताव सादर करणार आहोत लौकरच तारीख निश्चित करू"
वाय .एन . प्रभे. ग.वि.अधिकारी पं.स. म्हसळा
वाय .एन . प्रभे. ग.वि.अधिकारी पं.स. म्हसळा
Post a Comment