बोर्ली पंचतन कबड्डी स्पर्धेत चिंचमाता संघ विजयी

बोली पंचतनः वार्ताहर
बोर्ली पंचतन येथील बालसेवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये चिंचमाता क्रीडा मंडळ बोली पंचतन संघाने शितलादेवी बोलीपंचतन संघास नमवित अजिंक्यपद पटकावीले . बोर्ली पंचतन येथिल बालसेवा क्रीडा मंडळाच्या ६ व्या क्रीडा महोत्सवा निमित्त श्रीवर्धन - म्हसळा असोसिएशनच्या मान्यतेने एक दिवसीय खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन होळीच्या मैदानावर करण्यात आले होते . स्पर्धेचे उद्घाटन श्रीवर्धन माजी सभापती तथा शिवसेना उप तालुकाप्रमुख सुकमार तोंडलेकर यांच्या अध्यक्षतेखाली , माजी उपसरपंच लीलाधर खोत यांनी श्रीफळ वाढवून तर नालासोपारा मुंबई शिवसेना गटप्रमुख अभिनंदन नटे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले . स्पर्धेमध्ये एकूण २४ नामवंत संघांनी सहभाग घेतला होता . उपांत्यफेरीचे दोन्ही सामने अतिशय चुरशीची झाले . पहिल्या सामन्यांमध्ये चिंचमाता बोर्ली पंचतन संघाने सोमजाई भैरव संघाला १ गुणाने तर शितलादेवी बोर्ली पंचतन संघाने जाखमाता शिस्ते या संघास १ गुणाने पराभूत करीत अंतिम फेरी गाठली . चिंचमाता बोर्ली पंचतन व शितलादेवी बोर्ली पंचतन या संघामध्ये अंतिम सामना रंगला . यामध्ये प्रत्येक क्षण उत्कंठा वाढविणारा ठरला . चिंचमाता संघाने शितलादेवी संघावर मध्यतरानंतर चांगली आघाडी घेत सामना जिंकला . अंतिम विजयी चिंचमाता बोर्ली पंचतन संघास १० हजार रुपये व चषक देऊन तर अंतिम उपविजयी शितलादेवी बोर्ली पंचतन संघास ७ हजार व चषक देऊन तर तृतीय क्रमांक सोमजाई आगरवाडा म्हसळा व चतुर्थ क्रमांक जाखमाता शिस्ते या संघास ४ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले . स्पर्धे तील उत्कृष्ट चढाई चिंचमाता संघाचा प्रज्योत गाणेकर , उत्कृष्ठ पक्कड मुकेश धुमाळ तर अष्टपैलू खेळाडू अक्षय सायगावकर यांना आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा